दोंडाईचा येथे निर्माती एकता कपूर व बालाजी टेलीफिल्म कंपनी विरोधात तक्रार दाखल !

दोंडाईचा (संतोष कोळी) – धनगर समाजाकडून सुनिल धनगर यांनी फिर्याद दाखल केली असून त्यांत म्हटले आहे कि अभिनेत्री एकता कपुर आणि निर्माता बालाजी टेलीफिल्म कंपनी यांनी झी 5 या चॅनलवर सुरू केलीली व्हर्जिन भास्कर या वेब सीरियल मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला छात्रालव अर्थात गर्ल्स होस्टेल असे नाव दाखविण्यात आले.या होस्टेल मध्ये मुलींचे सेक्स बाबत गैरप्रकार चालवले जातात असे दाखवण्यात आले आहे.
एकता कपूर यांच्या या वेबसिरीजमुळे तमाम धनगर समाज बांधवांचे आराध्यदैवत पुण्यशोल्क अहिल्यादेवी होळकर यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचा प्रकार केला असून अहिल्यादेवी होळकर यांचा अपमान केला आहे.त्यामुळे सर्व धनगर समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. म्हणून अभिनेत्री एकता कपुर आणि निर्माता दिग्दर्शक यांच्या विरुद्ध महापुरूषांचा अवमान करणे, सार्वजनिक शातंताभंग करण्याचा प्रकार केला आहे.म्हणून भारतीय दंडसहीता कलम 499 नुसार गुन्हा दाखल करावा व या सिरियल वर बंदी घालावी अशी फिर्याद दोंडाईचा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांच्याकडे धनगर समाज संघर्ष समितीचे शिंदखेडा तालुका अध्यक्ष सुनिल धनगर व भैय्या धनगर, ईश्वर धनगर यांनी केली आहे.
याप्रसंगी धनगर समाज प्रतिनिधींना पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांनी आश्वस्त केले की, त्यांनी दिलेले निवेदन व फिर्याद एस पी चिन्मय पंडित व मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवून या प्रकरणाचा पाठवपुरवा करेल आणि लवकरात लवकर धनगर समाजा कडून आलेल्या तक्रारीविषयी कारवाई करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here