पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची शिवसेनेचे प्रवक्तेपदी नियुक्ती

धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – – राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षातर्फे याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या १० प्रवक्त्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यात मुख्य प्रवक्तेपदी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत, खासदार धैर्यशील माने, खासदार प्रियंका चतुर्वेदी, आमदार डॉ. नीलम गोर्‍हे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार सुनील प्रभू, आमदार प्रताप सरनाईक, महापौर किशोरी पेडणेकर यांची पक्ष प्रवक्ते म्हणून नियुक्ती झाल्याची माहिती शिवसेना कार्यालयातून देण्यात आली.
शिवसेनेच्या प्रवक्त्यांमध्ये उत्तर महाराष्ट्रातून एकमेव ना. गुलाबराव पाटील यांची प्रवक्ते म्हणून निवड करण्यात आली आहे. मुलूखमैदान तोफ म्हणून ओळखल्या जाणार्‍या ना. पाटील यांचे या माध्यमातून पक्षात वजन वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
ना.गुलाबराव पाटील यांच्या नियुक्तीबद्दल जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, उपजिल्हाप्रमुख प्रा.पी.एम.पाटील, तालुकाप्रमुख गजानन पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी, भानुदास विसावे, शहरप्रमुख राजेंद्र महाजन, जि.प.सदस्य गोपाल चौधरी, न.पा. गटनेते पप्पू भावे, उपनगराध्यक्षा सौ.कल्पना विलास महाजन, मा.प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, मा.प्रभारी नगराध्यक्षा सौ.सुरेखा विजय महाजन तसेच शिवसेनेचे सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here