रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक, सुशांतसिंह प्रकरणी मोठी कारवाई

मुंबई (हितेश मिस्त्री) – ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. एनसीबीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी ही मोठी कारवाई आहे. सुशांतचा नोकर दीपेशच्या चौकशीतून रियाचे नाव पुढे आले होते. त्यानंतर एनसीबी रियाला अटक केली आहे.
एनसीबीचे पथक रियाचा ताबा मागणार नसल्याची माहिती समोर येत आहे. एनसीबी रियाच्या रिमांडची मागणी करणार नाही, असेही वृत्त समोर आले आहे. दरम्यान, रियाला आजदेखील एनसीबीने चौकशी बोलावले होते. याआधी रियाचा भाऊ शौविक, सॅम्युअल मिरांडाला अटक झाली आहे.
सोमवारी सलग दुसर्‍या दिवशी 8 तास चाललेल्या चौकशीत अभिनेत्री रिया चक्रवर्तीने बॉलीवूडमधील 17 ते 18 बड्या हस्तींचे ड्रग्ज कनेक्शन उघड केल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी पुढारीला सांगितले. त्यामुळे या सर्व सेलिब्रिटींना राष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी विभागाकडून (एनसीबी) हाजीर हो चे समन्स बजावले जाऊ शकतात.
एनसीबीने सहा ड्रग्ज डीलर्ससह एकूण नऊ जणांना अटक केल्यानंतर आता रिया चक्रवर्तीची प्रदीर्घ चौकशी चौकशी सुरू झाली. रविवारी सहा तास आणि सोमवारी आठ तास चौकशी झाल्यानंतर रियाला पुन्हा मंगळवारचे समन्स बजावल्याच एनसीबीचे उपमहासंचालक मुथा जैन यांनी सांगितले. सिने अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी ड्रग्ज अँगलने तपास करणार्‍या एनसीबीने सोमवारी रियाला अटकेत असलेले शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंत यांच्यासमोर बसवून थेट प्रश्न विचारले. आपण सुशांतसाठीच अंमली पदार्थ विकत घेत होतो आणि स्वत: मात्र आयुष्यात कधीही ड्रग्ज घेतलेले नाही, याचा रियाने पुनरुच्चार केला. मात्र रियाच्या या चौकशीत बॉलीवूडचा नशेखोर चेहरा आता समोर येऊ लागल्याचे समजते. सोमवारच्या चौकशीत रियाने ड्रग्ज कनेक्शन असलेल्या बॉलिवूडमधील 17 ते 18 बड्या हस्तींची नावे घेतल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी पुढारीला सांगितले. परिणामी एनसीबी बॉलिवूड सेलिब्रिटींचीही चौकशी करण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here