अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणातील आरोपींला फाशी देण्यात यावी अन्यथा आंदोलन करू

शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – नंदुरबार जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणातील आरोपींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी तसेच आरोपीला फाशी देण्यात यावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा टायगर ग्रुप , नंदुरबार जिल्हा खान्देश विभाग महाराष्ट्र राज्य यांनी दिला आहे.
सदर प्रकरणात ३१ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार गुन्ह्याची नोंद रजिस्टर करण्यात आली आहे.तरी सदर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी व कुठल्याही कलमाच्या तरतुदी नुसार आरोपीस जामीन मिळू देऊ नये यासंदर्भात टायगर ग्रुप नंदुरबार यांच्यातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.या गुन्ह्यातील पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करू ,वेळ पडल्यास महाराष्ट्रभर आंदोलन करू असे मत संघटनेचे प्रमुख सदस्य आदित्य डोडवे यांनी व्यक्त केले आहे. यावेळी संघटनेचे इतर सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते तसेच चित्रकलथे समाजाचे जिल्हाध्यक्ष जगदीश चित्रकथे हे देखील यावेळी उपस्थित होते.पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू असे मत चित्रकथे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here