जळगावात एनएसयुआयकडून दाऊदच्या पुतळ्याचे दहन

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे निवास्थान असलेला मातोश्री बंगला उडवून देण्याची धमकी अंडरवर्ल्ड डान दाऊदच्या हस्तकांने फोनद्वारे दिली आहे. याचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटत आहे. जळगावात एनएसयुआय या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने काँग्रेसभवन सोमर दाऊदच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी दाऊदसह त्याला आश्रय देणाऱ्या पाकीस्तान विरोधात देखिल घोषणा देण्यात आल्यात.
मातोश्री बंगल्यावर रविवारी रात्री दुबईवरुन चार फोन काल आलेत. फोन करणाऱ्या व्यक्तीने दाऊदचा हस्तक असल्याचे सांगीतले. तसेच मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे मातोश्री हे निवास्थान उडवून देण्याची धमकी दिली. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमटले आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी जळगावात देखील एनएसयुआय या काँग्रेच्या विद्यार्थी संघटनेने दाऊदच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. जळगावातील काँग्रेसभवनसमोर सकाळी एनएसयुआयचे अध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली दाऊद यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी मातोश्री निवास्थान उडवून देण्याच्या भ्याड धमकीची निषेध करण्यात आला. मुर्दाबाद मुर्दाबाद दाऊद इब्राहीम मुर्दाबाद, दाऊदला आश्रय देणाऱ्या पाकीस्तानचा धिक्कार असो अश्या घोषणा देण्यत आल्यात.
यावेळी एनएसयुआयचे अध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी, महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निवासस्थान उडविण्याच्या दाऊदच्या हस्तकाने दिलेल्या भ्याड धमकीचा निषेध करीत असल्याचे सांगीतले. तसेच केंद्रातील मोदी सरकारने देखील भारतीय जनतेच्या भावनांशी राजकारण करण्यापेक्षा कुख्यात आंतकवादी व १९९३ च्या बाम्ब स्फोटातील संशयित दाऊद इब्राहीम याला भारतात आणण्यासाठी जर शक्ती खर्च केली तर ते देशवासियांच्या हीताचे ठरेल, अशी मागणीही देवेंद्र मराठे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here