कोल्हापूर (संपादक सुनिल पाटील) : बुलंद पोलीस टाइम्सच्या कोल्हापूर कार्यालयात झालेल्या बैठकीत बुलंद पोलिस टाईम्सच्या कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधीपदी वसीम मोमीन तर सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधीपदी डॉ.विलास गावडे यांची निवड करण्यात आली आहे.
ही निवड जाहीर झाल्यानंतर बुलंद पोलीस टाइम्सचे वरिष्ठ कार्यकारी संपादक मनोज अशोकराव सोनवले व यावेळी शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक श्री.महात यांचे हस्ते एका छोटेखानी कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधीपदी वसीम मोमीन तर सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधीपदी डॉ.विलास गावडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.







