कोल्हापुरात न्यायालयीन कर्मचारी संघटनांची संयुक्त बैठक संपन्न; मागण्यांसाठी आंदोलनाची दिशा निश्चित

न्यायालयीन कर्मचारी

कोल्हापूर (प्रतिनिधी रहिम पिंजारी) | राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज, ०६ सप्टेंबर २०२६ रोजी कोल्हापूर येथे चारही प्रमुख न्यायालयीन कर्मचारी संघटनांची एक महत्त्वाची संयुक्त बैठक संपन्न झाली. या बैठकीत प्रलंबित मागण्यांवर चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा आणि कृतीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

या संयुक्त बैठकीमध्ये कोल्हापूर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना (वर्ग-३), महाराष्ट्र स्टेट ज्युडिशियल स्टेनोग्राफर्स असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा न्यायालयीन बेलिफ कर्मचारी संघटना तसेच कोल्हापूर जिल्हा न्यायालयीन चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्ह्यातील चारही संघटनांचे समन्वयक तथा कोल्हापूर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी महासंघाचे मसुदा व कृती समिती प्रमुख श्री. महेश श. पाटील हे होते.शासनाने मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या बैठकीत देण्यात आला आहे.
त्यानुसार आंदोलनाचा पुढील कार्यक्रम खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आला आहे:काळ्या फिती लावून काम करणे: दिनांक १६ सप्टेंबर २०२६, १६ ऑक्टोबर आणि १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत.सामुदायिक रजा: दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रातील ३४५०० कर्मचारी एक दिवस सामूहिक रजेवर जाणार आहेत.बेमुदत संप: शासनाने यावरही निर्णय घेतला नाही, तर दिनांक १७ नोव्हेंबर २०२६ पासून सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जातील.कोल्हापूर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी वर्ग-३ संघटना आणि इतर संलग्न न्यायालयीन संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. न्यायालयीन कर्मचारी
यामध्ये विविध संघटनांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव पदांची जबाबदारी अनुभवी कार्यकर्त्यांवर सोपवण्यात आली आहे.जाहीर झालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी बेलिफ महासंघाच्या अध्यक्षपदी श्री. प्रकाश कुलकर्णी तर सचिवपदी रफिक पखाली यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य स्टेनोग्राफर असोसिएशनच्या उपाध्यक्षपदाची धुरा अभिजीत गायकवाड यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच, महाराष्ट्र स्टेट ज्युडिशिअल स्टेनोग्राफर्स असोसिएशन (शाखा कोल्हापूर) च्या अध्यक्षपदी सौ. शिला काशीद यांची निवड करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी बेलिफ संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी श्री. अन्वर पठाण सांभाळणार आहेत. तर कोल्हापूर जिल्हा न्यायालयीन चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षपदी श्री रणजित पाटील व संभाजी पोवार यांची नियुक्ती झाली आहे.यासोबतच, सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी आर. डी. कांबळे, उपाध्यक्षपदी भैय्यासाहेब कांबळे व दिलीप पाटील, आणि सचिवपदी श्री. सुरेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे.या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे न्यायालयीन कर्मचारी वर्गाकडून अभिनंदन केले जात असून, कर्मचाऱ्यांच्या हक्क आणि समस्यांसाठी हे मंडळ प्रभावीपणे काम करेल असा विश्वास व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here