कुर्ला येथे इमारतीच्या पार्किंगमधील २५ ते ३० दुचाकी अज्ञातांनी जाळल्या

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील कुर्ला पूर्व परिसरातील रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या इमारतीखाली उभ्या असलेल्या या दुचाकींना आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, आगीच्या ज्वाळा, लोट हे इमारतीच्या आठव्या मजल्यापर्यंत पोहोचत होते. गाड्यांनी पेट घेतल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. हे व्हिडीओ पाहून आग किती भीषण होती याचा अंदाज वर्तवला येईल. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र, या आगीत सर्वच्या सर्व दुचाकी या जळुन खाक झाल्या आहेत. सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवीतहानी झालेली नाहीये. ही आग कुणी लावली की लागली याबाबत अद्याप माहिती समजू शकलेली नाहीये.जळत्या सिगारेटचं थोटुक फेकल्यामुळे भाग भडकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

डिसेंबर २०१८ मध्ये सुद्धा मुंबईत अशाच प्रकारे जळीतकांड घडलं होतं. डिसेंबर २०१८ मध्ये शीव इथल्या श्री सुंदर कमलानगरमध्ये अज्ञातांनी दुचाकी जाळल्या. रात्री ३ वाजण्याच्या सुमारास १७ ते १८ दुचाकी वाहनं जाळण्यात आली होती. या दुचाकी कोणी जाळल्या, दुचाकी जळण्याचं नेमकं काय कारण हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here