चोपडा (प्रतिनिधि क्राइम रिपोर्टर रजत शेख) : २२ खेडा (मध्यप्रदेश महाराष्ट्र) मुस्लीम तेली ५३ गोत्र समाज तर्फे ७ वी तर चोपडा जि.जळगांवची पहेली ईज्तेमाई शादी संमेलन अर्थात सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दि. ३१ ऑक्टोंबर २०२१ वार रविवार रोजी सकाळी १० वाजता पद्म मोहन मंगल कार्यालय रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ यावल रोड, चोपडा येथे हा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.
या विवाह सोहळ्यात २२ जोडप्यांचे निकाह होणार असून, या जोडप्यांना भेटवस्तूही देण्यात येणार आहेत. या भेटवस्तूत कपाट, पेंडामिक पलंग, फ्रीज, कुलर, वाशिंग मशीन, चांदीची पायल, गादी रजाई, तक्या सेट, सिलींग फॅन आदींचा समावेश आहे. संमेलनस्थळी नकाब योजना केलेली असून, मास्क, तसेच सॅनिटायझरचीही व्यवस्था आहे. संमेलनादरम्यान सोशल डिस्टसिंगचे पालन करण्यात येणार असल्याची माहिती हाजी अब्दुल रहमान तेली यांनी दिली.या संमेलनासाठी वसिम रु.२२०० मुलीकडून तर चोपडा शादी कमेटी मुलाकडून रु.२२०० घेणार आहे. यावेळी उपस्थितांना जेवण देण्यात येणार असून, जेवणात मांडा व वरणभारत ठेवण्यात येणार आहे.
या सामुहिक विवाह सोहळ्यात गुजराथ, महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील २२ जोड़े विवाह बंधनात बांधले जाणार असून, वरवधू यांचे २० – २० नातेवाईंकांना या विवाह सोहळ्यास उपस्थितीची परवानगी असल्याची माहिती शादी कमेटी सदस्य हाजी इस्हाक तेली यांनी दिली.






