कारंजा (तालुका प्रतिनिधी हाफिज खान) : लोककलावंत तर ज्येष्ठ साहित्यिक यांचे प्रलंबित असलेले मानधन दिवाळीच्या आधी देण्यात यावे, अशी मागणी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखा कारंजा प्रमुख कार्यवाह श्रीकांत एस भाके यांनी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम यांच्यामार्फत निवेदन देवून केली आहे.
लोककलेच्या माध्यमातून आपले संपूर्ण आयुष्य कलेकरीता अथवा साहित्यिक क्षेत्राकरिता समर्पित केलेल्या लोककलावंत तथा नाट्यकलावंत साहित्यिक त्यांच्यावर कोरोना महामारी मुळे उपासमारीची वेळ आली आहे तसेच २०१८ पासून वाशिम जिल्ह्यातील वृद्ध कलावंत यांचे मानधन प्रस्ताव समाज कल्याण जिल्हा परिषद यांच्याकडे धूळखात पडलेले आहे याबाबत अजूनही मानधन समिती गठित न झाल्यामुळे कलावंत आर्थिक अडचणीत आलेला आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखा कारंजा प्रमुख कार्यवाह श्रीकांत एस भाके यांनी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम यांच्यामार्फत सांस्कृतिक कार्य मंत्री व पालक मंत्री वाशिम यांना निवेदन सादर केले आहे. श्रीकांत एस भाके हे एकमेव असे व्यक्ती आहेत ज्यांनी कलावंतासाठी जीवाला जीव लावून काम केले आणि कलावंताच्या प्रत्येक कामासाठी नेहमी तत्पर राहतात. त्यांच्या या प्रयत्नांबद्दल तालुक्यातील कलावंतांनी त्यांचे आभार मानले आहे.






