राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे फेसबुक पेज हॅक, सायबर सेलकडे केली तक्रार

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे फेसबुक पेज हॅक झाले आहे. आपलं फेसबुक पेज हॅक झाले असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी स्वतःच ट्विट करत दिली आहे.

याबाबतची तक्रार सायबर सेल आणि फेसबुककडे करण्यात आली आहे. राज्यात सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाले असल्याच्या अनेक घटना आहेत परंतु आता राज्यातील मंत्र्याचेच फेसबुक अकाऊंट हॅक झाले असल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमी सक्रिय असतात.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे फेसबुक पेज हॅक झाले आहे. धनंजय मुंडे फेसबुक वापरण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्यांना अॅक्सेस मिळत नव्हता. धनंजय मुंडे यांचा अॅडमिन अॅक्सेस काढल्यामुळे त्यांना आपलं फेसबुक अकाऊंट वापरण्यास असमर्थता येत आहे. आपलं फेसबुक अकाऊंट हॅक झाले असल्याची बाब मुंडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी फेसबुक आणि सायबर सेलकडे तक्रार केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here