नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : येथे एका प्रसिद्ध खून खटल्यात साक्षीदार म्हणून बोलावण्यात आलेला व्यक्ती तंबाखू खाऊन न्यायालयात गेल्याची घटना उघडकीस आली आहे. तंबाखू खाऊन साक्ष देण्यासाठी न्यायालयात गेलेल्या साक्षीदाराचं कृत्य पाहून न्यायाधीशही त्याच्यावर भडकले आहेत.
तोंडात तंबाखू असल्याने त्याला न्यायालयात नीट बोलताही येत नव्हतं. एवढंच नाही तर जे काही तोडक्या मोडक्या आवाजात बोलत होता. ते न्यायधीशांनी देखील कळत नव्हतं. त्यामुळे संतापलेल्या न्यायाधीशांनी संबंधित साक्षीदाराला दंड ठोठावला आहे. ही घटना वकील शाहीद आझमी यांच्या खून खटल्याच्या सुनावणी दरम्यान घडली आहे. साक्षीदार तंबाखू खाऊन आल्याने बराच वेळ न्यायालयातील तापमान वाढलं होतं.
याबाबत समजलेली माहिती अशी की, वकील शाहीद आझमी यांच्या खून प्रकरणी साक्ष देण्यासाठी एका साक्षीदाराला न्यायालयात बोलावण्यात आलं होतं. मात्र संबंधित साक्षीदाराच्या तोंडाच तंबाखू असल्याने त्याला न्यायालयात व्यवस्थित बोलता येत नव्हतं. तो नेमकं काय बोलत आहे, हे कोणालाही कळत नव्हतं. त्यामुळे न्यायाधीशांचा संताप अनावर झाला होता. न्यायालयीन प्रक्रियेशी साक्षीदाराचं काहीही देणं घेणं नसल्याचं निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवून त्याला १०० रुपयांचा दंड ठोठावला. यावेळी सरकारी वकिलांनी साक्षीदाराची बाजू मांडत न्यायालयाला सांगितलं की, साक्षीदार हा गरीब घरातली असून, त्याला न्यायालयाच्या नियमांबद्दल फारशी माहिती नाहीये. पण न्यायालयाने सरकारी वकीलांचा युक्तिवाद अमान्य करत साक्षीदाराला १०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.






