मौजमजेसाठी वाहन चोरी करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांकडून तीन रिक्षा सहा दुचाकी जप्त

पुणे (प्रतिनिधी नारायण शेळके) – पिंपरी चिंचवड शहरात रात्रीच्या वेळी वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते त्यावर नियंत्रण राखण्यासाठी चिंचवड पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली आहे,
चिंचवड पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे,त्यांच्या कडून तीन रिक्षा आणि सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत, ही मुले मौजमजा करत फिरण्यासाठी वाहन चोरी करत असल्याची कबुली मुलांनी पोलिसांना दिली आहे, या कारवाई मुळे पुणे पिंपरी चिंचवड शहरातील सहा पोलीस ठाण्यातील सात गुन्हे उघडकीस आले आहेत,तर दोन दुचाकीच्या मालकांचा पोलीस शोध घेत आहेत, पिंपरी चिंचवड शहरात रात्रीच्या वेळी वाहन चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे त्यावर नियंत्रण राखण्यासाठी चिंचवड पोलिसांनी रात्रीची गस्त घालत असताना रिव्हर ह्यू हॉटेल जवळ तीन मुले एकाच दुचाकी वरून येत असल्याने पोलिसांना दिसले तिन्ही मुलांचा संशय आल्याने पोलिसांनी त्या तिघांना थांबवुन त्यांच्याकडीलअसलेली दुचाकीबाबत चॊकशी केली मुलांनी पोलिसांना दुचाकीच्या कागतपत्राबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे पोलिसांनी तिघांना पोलीस स्टेशनला आणून त्यांची कसून चॉकशी केली त्यामुळे ती दुचाकी त्यांनी चिंचवड येथील रांका जेलर्स या दुकाना समोरून चोरी केल्याचे सांगितले तसेच त्या मुलांनी मौजमजा करण्यासाठी आणि फिरण्यासाठी खडकी,हिंजवडी,वाकड,भोसरीMIDC, आणि चिंचवड येथून दुचाकी आणि रिक्षा चोरी केल्याचे सांगितले पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलाकडून तीन रिक्षा आणि सहा दुचाकी असा एकूण तीन लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज जप्त केला त्याच्या कडून आणखी वाहने मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे,
या कारवाई मुले वाकड पोलीस ठाण्यातील दोन चिंचवड ,भोसरी MIDC,खडकी,या पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत, ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्णा प्रकाश,अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त स्मिता पाटील ,सहाय्यक आयुक्त रामचंद जाधव,वरिष्ठ निरीक्षक रवींद्र जाधव,निरीक्षक( गुन्हे ) विश्वजित खुळे, यांच्या मार्गदर्शना खाली तपास पथकाचे सहाय्यक निरीक्षकअभिजीत जधाव,पोलीस कर्मचारी पांडुरंग जगताप,स्वपिल शेलार,ऋषिकेश पाटील,विजयकुमार आखाडे, नितीन राठोड,पंकज भदाने,गोविंद डोके,अमोल माने ,यांच्या पथकाने केली आहे,

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here