शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती मधील खरेदी -विक्री व्यवहार सुरु करा अन्यथा शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन उभारण्याचा प्रहार जनशक्ती पक्षाकडून इशारा

शिरपूर (प्रतिनिधी प्रशांत वाकडे (वरुळ)) – कृषी उत्पन्न बाजार समितीमधील काही कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्यामुळे 4सप्टेंबर पासून बाजार समितीने खरेदी विक्री व्यवहार पूर्णपणे बेमुदत बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. यापूर्वी तालुक्यातील अनेक वित्तीय संस्था, सहकारी संस्था, बँका आदी ठिकाणी अधिकारी, कर्मचारी कोरोना बाधित आढळले परंतु त्यांनी कामकाज बंद केल्याचे उदाहरण दिसले नाही. या पार्श्वभूमीवर आपण बाजार समितीने घेतलेला निर्णय शेतकऱ्यांवर प्रचंड अन्यायकारक असल्याचे निदर्शनास आणून दिले.
अतिवृष्टी मुळे शेतकरी संकटात आहे त्यामुळे साठवलेला माल मिळेल त्या भावात देण्याशिवाय पर्याय नाही अन्यथा शेतकरी नैराश्य वैफल्य आत्महत्यासारख्या अनिष्ट घटनात बदलू शकते. लवकरच बाजार समितीचे सर्व व्यवहार सुरु करावे अन्यथा शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन उभारले जाईल व त्याच्या परिणामाची सर्व जबाबदारी बाजार समितीची असेल असा इशाराचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाकडून देण्यात आले. निवेदन देतांना ईश्वर बोरसे, मुकेश पाटील, प्रमोद बडगुजर, संदीप कोळी, विजय कोळी, स्वप्नील राजपूत, नितीन जाधव, महेंद्र पाटील, किशोर बोरसे, नाना माळी, मनोज राजपूत, योगेश सूर्यवंशी, निलेश कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here