जळगाव (संपादक सुनिल पाटील) – नुकतेच नाशिक महानगरपालिका आयुक्तपदाचा पदभार कैलास जाधव यांनी
स्वीकारला. त्यांनी दक्ष पोलिस टाइम्सला नेहमीच सहकार्य केले असल्याने, दक्ष पोलिस टाइम्सचे संस्थापक तथा सरपंच विजय टाटिया यांनी स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकारी संपादक तथा नगरसेवक राकेश पाटील व प्रतिनिधी प्रकाश धुरवे उपस्थित होते.
यापुर्वी निफाड प्रांत व निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून नाशिक मध्ये काम केल्याने शहरातील महत्वाचे प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाशी लढताना दुसरीकडे नगरसेवकांना सोबत घेवून समन्वयातून पालिकेच्या कामकाज करेल. मुंबई, पुणे नंतर नाशिक शहर वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे नियोजनबध्द पध्दतीने शहराचा विकास करणे महत्वाचे आहे. त्यासाठी सर्वांना सोबत घेवून काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांची बुधवारी शासनाकडून बदली करण्यात आली त्यांच्या जागी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार श्री. जाधव यांनी आयुक्त पदाचा कार्यभार श्री. गमे यांच्याकडून स्विकारला. पदभार स्विकारल्यानंतर नवनियुक्त आयुक्त जाधव यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नाशिक कोरोना मुक्त करण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.







