आदिवासींना रेशनकार्ड मिळण्यासाठी चोपडा तहसीलदारांसोबत बैठक

चोपडा (तालुका प्रतिनिधी संदीप ओली) – मंगळवारी (दि.८) दुपारी १२:३० ला श्रीमती प्रतिभाताई शिंदे यांच्या आदेशानुसार तहसीलदार गावित यांच्या दालनात आदिवासी बांधवांना रेशन कार्ड मिळाले पाहिजे यासाठी बैठक आयोजित करण्यात आली त्यावेळी प्रकाश बारेला जिल्हा अध्यक्ष, संजीव शिरसाठ जिल्हा सरचिटणीस, ताराचंद पावरा विभाग अध्यक्ष, बुधा बारेला व सर्व लोक संघर्ष मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तहसीलदारांसमवेत चर्चा झाली व कॅम्प घेऊन रेशनकार्ड धारकांना वाटप करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here