शिक्षकांमुळे कोरोना होण्याच्या भीतीने उपजिल्हाधिका-याची भेटण्यास मनाई

नागपूर (प्रतिनिधी मनोज बाचले) – शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शिक्षकांना कोव्हिड 19 सर्वेक्षणाच्या कामातून कार्यमुक्त करण्यासाठी शिक्षण समन्वय समितीमार्फत आज निवेदन देण्यासाठी गेले असता निवासी उपजिल्हाधिकारी श्री खजांजी साहेब यांनी शिक्षकांना भेटण्यास व निवेदन घेण्यास मनाई केल्याने समितीतर्फे संताप व्यक्त करून निषेध नोंदविला.
कोव्हिड या आजाराचे सर्वेक्षण करण्यासाठी शाळांतील शिक्षकाच्या सेवा मुख्याध्यापक किंवा व्यवस्थापनाला कोणतीही सूचना न देता अधिग्रहित करण्यात आलेल्या आहे. 24 जून च्या परिपत्रकानुसार काही शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याचे तर काही शिक्षकांना घरून ऑनलाइन शिक्षण प्रक्रियेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकडे लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. शाळा प्रत्यक्ष सुरू नसल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे.नागपूर शहरात वर्ग ११वी चे ऑनलाईन प्रवेशाचे काम सुरू आहे. परंतु बरेच शिक्षक कोव्हिड रूग्ण सर्वेक्षणाच्या कामात व्यस्त असल्याने ऑनलाइन शिक्षण कसे सुरु करायचे याचा प्रश्न शिक्षकांना पडला.17 ऑगस्ट च्या शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार शिक्षकांना ऑनलाइन शिक्षणात पूर्णवेळ सहभागीही होता यावे यासाठी स्थानिक प्रशासनमार्फत कोव्हिड सर्वेक्षणातिल शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची विनंती करण्याचे आदेश देण्यात आले. त्यादृष्टीने स्थानिक प्रशासनाने विनंती करूनही अद्यापही जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयाकडून शिक्षकांना कार्यमुक्त केले नसल्याने शिक्षक समन्वय समिती पदाधिकारी आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्याकरिता गेले असता निवासी जिल्हाधिकारी श्री खजांजी साहेब यांनी शिक्षकांपासून कोव्हिडची लागन होण्याच्या भीतीने समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांना प्रवेश नाकारून भेटण्यास मनाई केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृतीचा शिक्षण समन्वय समितीतर्फे निषेध करण्यात आला. तसेच ज्या शिक्षकांना सर्वेक्षणाचे कार्य सोपविण्यात येत आहे त्यांनी कोव्हिड सर्वेक्षणावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन समन्वय समितीमार्फत करण्यात आले. यावेळी शिक्षक समन्वय समितीचे मुख्य संयोजक श्री. अनिल गोतमारे, डॉ.अशोक गव्हाणकर, श्री.बाळा आगलावे, श्री.सुभाष गोतमारे,श्री. सुधीर वारकर,श्री. विठ्ठल जुनघरे, श्री.गजानन भोरड,श्री. भरत रेहपाडे, श्री.नरेन्द्र पिंपरे श्री.धनराज राऊत, श्री. लक्ष्मीकांत व्होरा,डॉ. मनीष निंबाळकर, श्री.कुंदन सुर्यवंशी, श्री.राठोड, श्री.भोयर इत्यादी शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here