नागपूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर आकाश शेगये) : समृद्धी महामार्गावर कार चालवताना डुलकी लागल्याने समोरील कंटेनरला कारची मागून धडक लागल्याने कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात आई आशालता हनुमंत कणबर्गी (८४ वर्ष ) आणि मुलगा विकेकानंद कणबर्गी (५६ वर्ष ) यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विवेकानंद कणबर्गी आणी त्याची आई आशालता हे कारने ठाणे येथून नागपूरला येत होते. काल (दि.१) सकाळी ६:१५ वाजताच्या दरम्यान कार चालवत असलेल्या विवेकानंद यांना झोपेची डुलकी आली. दरम्यान त्याने कार समृद्धी महामार्गच्या मिडल लाईन मधील समोर चालत असलेल्या कंटेनरला मागून धडक दिली.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांच्या उपनिरीक्षक दिलीप थाटे प्रकाश चौधरी हे घटनास्थळी दाखल झाले. धडक इतकी भीषण होती की, कारमधील आशालता यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक विवेकानंद याला महामार्ग पोलीस रुग्णालयात नेत असतांना वाटेत त्यांचा देखील मृत्यू झाला.घटनेनंतर समृद्धी महामार्गवरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. महामार्ग पोलिसांनी तात्काळ दखल घेत क्रेनच्या सहाय्याने कारला बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. घटनेची नोंद सेलू पोलिसात करण्यात आली आहे.







