नागपूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर आकाश शेगये) : शहर पोलीस आयुक्त कार्यालयात अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर अंकुशराव झोल यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण नागपूर पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस वसाहतीत ज्ञानेश्वर झोल यांनी अज्ञात कारणावरून हॉलमध्ये गळफास घेतला. लक्षात येताच त्यांना तातडीनं उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच मृतकाची पत्नी पूजा ज्ञानेश्वर झोल यांच्या सूचनेवरून गिट्टीखदान पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक खुटवळ यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील चौकशी सुरू आहे.







