हावडा-मुंबई एक्स्प्रेसमध्ये गांजा तस्करी; ६०.७५० किलो गांजा जप्त

गांजा तस्करी

नागपूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर आकाश शेगये) : मध्यवर्ती रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे सुरक्षा दलाने मोठी कारवाई करीत हावडा-मुंबई एक्स्प्रेसने आंतरराज्यीय गांजा तस्करीचा पर्दाफाश केला. दोन आरोपींना अटक करून तब्बल ६०.७५० किलो गांजा जप्त केला. गांजाचे बाजार मूल्य ३० लाख ३७ हजार ५०० रुपये आहे.

या प्रकरणी पोलिसांनी चंदेश्वर पासवान (वय ४१) आणि विक्की कुमार (वय १९) (दोन्ही रा. बिहार) या दोघांना अटक करण्यात आली. रेल्वे मंडळाच्या निर्देशानुसार रेल्वे गाड्या व रेल्वे स्थानक परिसरात प्रतिबंधित अमली पदार्थ, दारू व तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी ‘ऑपरेशन नार्कोस’ अंतर्गत सातत्याने तपास मोहीम राबवली जात आहे. याअंतर्गत रेल्वे सुरक्षा दलाच्या नागपूर शाखेने गोपनीय माहितीच्या आधारावर गाडी क्रमांक १२८१० हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेसमध्ये खात ते नागपूर दरम्यान तपासणी मोहीम राबविली.
तपासणीदरम्यान ए-१ कोचमधील बर्थ क्रमांक १ व ६ खाली ठेवलेले ४ पिड्डू बंग व २ ट्रॉली बंग संशयास्पद अवस्थेत आढळले. बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा मिळाला. चौकशी केली असता बंग वरील आरोपींची असल्याचे समोर आले. दोघांनाही ताब्यात घेऊन विचारपूस केली असता बॅग त्यांचीच असल्याची कबुली दिली. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जप्त अमली पदार्थांसह दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी जीआरपी इतवारी पोलिसांकडे सुपूर्द केले. ही कारवाई मंडल सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे सुरक्षा दल, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडल यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here