निसर्ग-मित्र समिती चे चोपडा तालुका संपर्क-प्रमुख विश्रामजी तेले यांची कामगिरी

चोपडा (तालुका प्रतिनिधी संदिप ओली) – छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समितीच्या चोपडा तालुका संपर्क प्रमुख विश्राम तेले यांच्या विशेष प्रयत्नाने फळबाग सिंचित रोपवन योजने अंतर्गत चोपडा वनक्षेत्रातील चौगाव येथील कंपार्टमेंट नं.260 मध्ये पाच हेक्टर क्षेत्रावर दोन हजार फळ झाडे जुलै 2020 मध्ये लावण्यात आली होती.पावसाळा चांगला झाल्याने सर्व झाडे जोमाने वाढत असली तरी या पुढे झाडांना जल व्यवस्थापणासाठी आज पासून ठिबक सिंचन टाकण्यास सुरवात झाली आहे.लवकरच संपुर्ण पाच हेक्टर वर ठिबक टाकली जात असून ,पुढच्या वर्षी याच पाच हेक्टरला लागून अजून पाच हेक्टर सिंचित रोपवनसाठी विश्राम तेले यांनी वन विभागाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.तर पाच वर्षात पंचवीस हेक्टर वर दहा हजार फळझाडे सिंचनाने जगवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.तसेच पुढील वर्षापासून याच ठिकाणी वन विभाग व निसर्ग मित्र समितीच्या माध्यमातून रोपवाटीका तयार करण्याचाही त्यांचा विचार आहे.गेल्या पाच वर्षात आमदार आण्णासाहेब चंद्रकांतजी सोनवणे,ग्राम पंचायत,ग्रामस्थ व कृषी विभागाच्या सहकार्याने जल संधारणाची कामे ही मोठ्या प्रमाणात केली गेलीत.त्याचा परीणाम सतत टंचाईग्रस्त असलेल्या चौगाव परीसरात आज पाण्याची पातळी सुमारे तिनशे फुटांनी वर आली आहे.तसेच चोपडा पंचायत समिती सभापती भाऊसो.आत्माराम म्हाळके यांच्या पर्यटन विकास निधीतून त्रिवेणी मंदिरावर तीन लाखाचे पेव्हर ब्लाक मागिल वर्षी बसवण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here