हुतात्मा दिना निमित्त नंदुरबारच्या बालशहिदांना अभिवादन

नंदनगरीने दिला बालशहिद शिरीषकुमार मेहता यांच्या स्मृतींना उजाळा

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – नंदुरबारचे बालशहिद शिरीष कुमार मेहता यांच्या स्मृतींना उजाळा देत शहरातील माणिक चौक येथील शहीद शिरीष कुमार मेहता यांच्या स्मारकास भारत सरकारचे माजीअतिरिक्त महाभियोक्ता एड.राजेंद्र रघुवंशी यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले तसेच पोलीस दलातर्फे बालशहिदांना विशेष मानवंदना देण्यात आली. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात नंदुरबार शहराची ओळख शहीदांची भूमी म्हणून परिचित आहे . २८ डिसेंबर १९२६ ला गुजराथी ,मेहता घराण्यात शिरीषकुमारचा जन्म झाला.
शिरीष कुमार यांच्यावर महात्मा गांधी व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मोठा प्रभाव होता. त्या काळात “वंदे मातरम्‌’ आणि “भारत माता की जय’ असा जयघोष करणाऱ्यांना तुरुंगात डांबण्यात येई.
महात्मा गांधींनी ९ ऑगस्ट १९४२ ला इंग्रजांना “चले जाव’चा आदेश दिला. त्यानंतर गावोगावी ब्रिटिशांविरोधात प्रभातफेरी व आंदोलनांना सुरवात झाली . या स्वातंत्र्ययुद्धात ९ सप्टेंबर १९४२ ला नंदुरबारमध्ये निघालेल्या प्रभात फेरीत आठवीत शिकत असलेला शिरीष सहभागी झाला होता. भारत मातेचा जयघोष करीत ही फेरी गावातून फिरत होती. मध्यवर्ती ठिकाणी ती फेरी पोलिसांनी अडवली. शिरीषकुमारच्या हातात झेंडा होता. पोलिसांनी ही मिरवणूक विसर्जित करण्याचे आवाहन केले.हिम्मत असेल तर माझ्यावर गोळी चालवा!’ असं म्हणत अवघ्या 16 वर्ष वयाच्या शिरीषकुमारांनी इंग्रज अधिकाऱ्याला आव्हान दिलं. गेंड्याच्या कातडीच्या या ब्रिटिश अधिकाऱ्यांनं क्षणाचाही विलंब न करता बेछूट गोळीबार केला.त्यात शहीद शिरीषकुमार व त्यांचे चार साथीदार मारले गेले.कोवळ्या वयाच्या या बालकांना देशाच्या स्वातंत्र्यसाठी जीव गमवावा लागला.या सर्व साथीदारामध्ये सर्वात कमी वयाचे म्हणून बालशहीद शिरीशकुमार हे होते. म्हणून त्यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. त्याच्यासोबत पोलिसांच्या गोळीबारात लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशिधर केतकर, घनश्‍यामदास शहा हे अन्य चौघेही शहीद झाले.
शिरीषकुमार व त्याचा साथीदारांनी हसत हसत देशासाठी बलिदान दिलं. म्हणून 9 सप्टेंबर हा शहीद दिवस म्हणून साजरा करण्यात येतो .त्या निमित्त आज शहीद स्मारकावर मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले व पोलिस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली .यावेळीअध्यक्ष – शहीद शिरीष कुमार मित्र मंडळ तसेच या पुष्पार्पण कार्यक्रमचे अध्यक्ष तथा शहीद स्मृती स्मारकाचे अध्यक्ष एड रमणलाल शहा,कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर शहिदस्मृती स्मारकाचे संस्थापक प्रा.डॉ.पितांबर सरोदे यांनी बालशहिदांना पुष्पांजली अर्पण केली. यावेळी रमाकांत पाटील,प्रा.राजेंद्र शिंदे,किर्तीकुमार सोलंकी,पांडुरंग माळी,निंबाजीराव बागुल,मनीष शहा,संदीप चौधरी,शीतल पटेल,गोविंद अग्रवाल,प्रदीप पारेख,निलेशभाऊ शहा,राजू सोमाणी हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here