सत्तेचा एवढा माज करू नका पत्रकार पागल तर आपण कोण? संजय राऊत उत्तर द्या 

राज्यातील असंख्य पत्रकाराची माफी मागा – अनिल महाजन,
प्रदेश अध्यक्ष – वेब मीडिया असोसिशएन मुंबई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – संजय राऊतचे डोके ठिकाणावर आहे का ? पत्रकारांना पागल म्हणत आहे. यांचा जाहिर निषेध. बुडाखाली आग लागली की असे वक्तव्य निघते. राऊत यांच्या जीभेला हाड नाही. कुठे गेले वरिष्ठ पत्रकार जे पत्रकारांच्या हिताच्या गप्पा मारतात. या राऊत कंगनाची सोडा पण पत्रकारांची माफी मागीतली पाहिजे तुम्ही.एका मागून एक चूका शिवसेना करत आहे.शिवसेने बद्दल जनते मधला  आदर कमी होतोय याची जाणीव आणि अभ्यास शिवसेनेच्या नेत्यांनी करावा पत्रकारांना पागल बोलणे ही संस्कृती आहे का? शिवसेनेची ही खरचं बाळा साहेबाची शिवसेना आहे का? संजय राऊत तुम्हाला पत्रकारांनी मोठं केलं हे विसरू नका तुमचं राजकारण जरूर करा तुम्ही पण पत्रकारांच्या नांदी लागू नका तुमचे सरकार काही पत्रकारांना पगार देत नाही.
लोकमान्य टिळक पत्रकार होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकार होते. लालकृष्ण अडवाणी पत्रकार आहेत. अनेक महापुरुष पत्रकार होऊन गेले आहेत. या सर्वाचा हा अपमान आहे आपण पत्रकारांची आपण माफी मागा. संजय राऊत हे स्वता पत्रकार आहेत. त्यांनी अस भाष्य करणे म्हणजे , स्वतःला पत्रकार म्हणून घेणारे .संजय राऊत हे पत्रकार नाही आहे. आता सिद्ध झाले ते फक्त सामान या पेपरचे पत्रकार आहे हे पण सिद्ध झाले आहे.
मुख्यमंत्री उद्धव साहेब आपण सुद्धा एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत. सामनाचे अनेक वर्ष संपादक होतात. आपल्या घरात पत्रकारिता ने जन्म घेतला आहे. संजय राऊत पत्रकारांना पागल म्हणता हे योग्य आहे का ? याला आपले समर्थन आहे का ? उत्तर द्या आणि संजय राऊत, अनिल परब यांना आवरा आपण राज्याचे प्रमुख आहेत. पत्रकारांना अपशब्द वापरणे हे आपल्या सरकारला महागात पडू शकते एखादा पत्रकार चुकीचे करत असेल त्याला शिक्षा द्या सरकार तुमचं आहे. पण सर्व पत्रकारांना वेठीस धरणे योग्य नाही आज सकाळी टीव्ही चॅनलच्या लोकांना संजय राऊत यांनी लाईव्ह केमेरा समोर पागल म्हटले आहे.तो व्हिडिओ आपण बघावा पत्रकारा बद्दल अपशब्द बोलणाऱ्या नेत्यांचा आह्मी वेब मीडिया असोसिएशन तर्फे जाहीर निषेध करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here