जळगाव जिल्ह्यात ८२४ कोरोनामुक्त पण २० कोरोनाबाधितांचा मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्णांचा स्वॅब तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आज (दि.९) जिल्ह्यात ८८९ कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. दरम्यान ८२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असतांनाच २० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सकांनी दिली आहे. आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३५ हजार ३४२ एवढी झाली आहे.
आज आढळलेल्या ८८९ कोरोनाबाधितांमध्ये सर्वाधिक १३६ कोरोनाबाधित हे चाळीसगाव विभागातले आहेत. त्याचप्रमाणे जळगाव शहर ७५, जळगाव ग्रामीण ३१, भुसावळ ६५, अमळनेर ४७, चोपडा ४८, पाचोरा ५६, भडगाव ३६, धरणगाव ८३, यावल १९, एरंडोल ४१, जामनेर ८८, रावेर १४, पारोळा ६६, चाळीसगाव १३६, मुक्ताईनगर २३, बोदवड ४६, इतर जिल्ह्यातील १५ अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात २० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर, पाचोरा तालुका प्रत्येकी ४, भुसावळ तालुका ३, जळगाव व अमळनेर तालुका प्रत्येकी २ तर रावेर, चाळीसगाव, एरंडोल, चोपडा, भडगाव तालुक्यात प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश असल्याची माहिती शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here