आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त क्रीडाशिक्षक प्रविण पाटील यांचे अभिनंदन

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – शहरातील क्रीडा क्षेत्रातील कुशल संघटक, उदयोन्मुख नेतृत्व व सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करणारे उपक्रमशील खुबचंद सागरमल विद्यालयाचे क्रीडा शिक्षक व जळगाव जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाचे सहसचिव प्रविण पाटील यांना जिल्हा परिषद (माध्यमिक) विभागाचा जिल्हास्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे दिशा स्पर्धा परिक्षाचे संचालक वासुदेव पाटील, शिक्षक आघाडी तालुकाध्यक्ष आर.के.पाटील व जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here