जळगावात आज १३२ कोरोना बाधित रुग्ण

जळगाव – जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. जिल्ह्यात केलेल्या तपासणीतील १३२ कोरोना संशयितांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील १८, भुसावळ, ६, जळगाव ग्रामीण ६, अमळनेर २, चोपडा २७, पाचोरा ५, भडगाव १८, धरणगाव ३, यावल ५, एरंडोल ४, जामनेर २, रावेर ८, पारोळा १३, चाळीसगाव ७, मुक्ताईनगर २ अशी एकूण १३२ रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता २२८१ झाली आहे. आज मोठ्या संख्येने रुग्णांमध्ये वाढ झाल्याने जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here