दर्जीच्या 26 विद्यार्थी एमपीएससी-राज्यसेवा परीक्षेत यशस्वी

जळगांव – येथील स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अग्रगण्य दर्जी फाऊंडेशनच्या 27 विद्यार्थ्यांची एमपीएससी-राज्यसेवा परीक्षेतून विविध पदांसाठी निवड झालेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी तर्फे राज्यसेवा परीक्षेअंतर्गत 2019 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांचा अंतिम निकाल नुकताच जाहिर झाला. या अंतिम निकालातून दर्जी फाऊंडेशनच्या 27 विद्यार्थ्यांनी यशस्वी होत उत्तुंग भरारी घेतलेली आहे. यात वसिमा महेबूब शेख या विद्यार्थींनीची उपजिल्हाधिकारी पदावर निवड झालेली असून ती महिलांच्या खुल्या संवर्गातून महाराष्ट्रात तिस-या क्रमांकाने यशस्वी झालेली आहे.
यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमधून विपूल विजय पाटील व आरती राजेंद्र पाटील यांची पोलीस उपअधिक्षक अर्थात डी.वाय.एस.पी. पदावर निवड झालेली आहे. तहसिलदार पदावर दर्जीच्या तब्बल 7 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे यात मोहनिश शेलवटकर, रेखा रामभाऊ वाणी, प्रशांत व्यंकटराव पाटील, प्रस्ननजित प्रकाश चव्हाण, रूणय प्रकाश जकुलवार, अक्षय अशोक ढाकणे, शुभम शंकरराव बहाकर हे उत्तीर्ण झालेले आहेत. इतर यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये शुभम अशोकराव घुगे – कक्षाधिकारी, प्रदीप रामदास शेंडगे – उपमुख्यकार्यकारी अधिकारी, अजिंक्य शहाजी सुर्यवंशी – उपमुख्यकार्यकारी अधिकारी, राहुल दौलतराव ठोंबरे – एम.आय.डी.सी. अधिकारी, राम शहाजीराव फरकांडे – उपशिक्षणाधिकारी, सायली हेमंत चिखलीकर – सहाय्यक प्रकल्प अधिकारी हे उत्तम गुणांकानी यशस्वी झालेले आहे. नायब तहसिलदार पदावर 10 विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत. यात दत्ता हरिभाऊ बोरसे, नितीन कांतीलाल हराड, रवि व्यंकटराव अकुलवार, अनिल बाबुराव पाटील, महेश दिलीप अनारसे, विक्रांत कृष्णा जाधव, अमोल महादेव नरूटे, संदीप काशिनाथ हाडगे, निखिल राजू पाटील आणि महेश संतोष देशमुख यांनी यश संपादन केलेले आहे. उपशिक्षणाधिकारी पदावर निवड झालेला राम फरकांडे हा खुल्या संवर्गातून महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे तर तहसिलदार पदावर निवड झालेला प्रसन्नजित चव्हाण हा खुल्या संवर्गामध्ये महाराष्ट्रातून दुसरा आलेला आहे. संदीप काशिनाथ हाडगे हा दिव्यांग विद्यार्थी देखिल यशस्वी झालेला असून त्याची नायब तहसिलदार पदी निवड झालेली आहे.
राज्यसेवा परीक्षेतून विद्यार्थ्यांची झालेली निवड खुपच आनंददायी गोष्ट असून वसिमा शेख हिची उपजिल्हाधिकारी पदी झालेली निवड खुपच मोलाची आहे. तसेच दिव्यांग गटातील संदीप हाडगेचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे याच वर्षी दर्जी फाऊंडेशनच्या 102 विद्यार्थ्यांची पी.एस.आय. पदासाठी निवड झालेली असून राज्यसेवा परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या 26 विद्यार्थ्यांमुळे आमच्या मार्गदर्शनाचा उत्साह द्विगुणित झालेला आहे. भविष्यातही असेच गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन ठेवून विद्यार्थ्यांना यशस्वी करण्याचा मानस आहे. असे मत गोपाल दर्जी यांनी व्यक्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रा. गोपाल दर्जी यांच्यासह सौ. ज्योती दर्जी, श्रीराम पाटील, रविंद्र लढ्ढा आदींनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here