अनेक नविन बॉलिवुड स्टार आजूनही मानसिक तणावाखाली आहेत – अनिल महाजन

मुंबई – बॉलिवुड मध्ये काय सुरू आहे.अनेक नव-नवीन कलाकार आपले कारियर घडवण्यासाठी मुबंई येथे फिल्म नगरी मध्ये आपले भविष्य आजमावत आहेत. संपूर्ण जगामध्ये मुबंई बॉलिवूड इंडस्ट्रीज ही मोठी नावाजलेली आहे. अशातच पूर्ण जगभरातून लोक येथे येत असतात. यात स्वतःचा जास्तीस जास्त फायदा कसा होईल यात काही प्रोडक्शन कंपनी /प्रोड्युसर/डायरेक्टर आपला दबाव जमवताना दिसत आहे.मोठ्या प्रमाणात येथे दादागिरी सुरू आहे. पण आम्ही ती खपून घेणार नाही.अनेक मोठ्या प्रोडक्शन कंपनी /प्रोड्युसर/डायरेक्टर ह्या लहान-लहान प्रोडक्शन कंपनी /प्रोड्युसर/डायरेक्टर वर दबाव टाकतात त्यानं इंडस्ट्री मध्ये काम करू देत नाही. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी आम्ही मोहीम राबवत आहोत. बॉलिवुड मध्ये अन्याय होणाऱ्या लोकांना आम्ही मदत करणार ज्या ज्या कलाकारांन वर अन्याय होत असेल. अशा कलाकार लोकांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहोत. कोणीही कोणाला ही घाबरू नये मी आपल्या पाठीशी आहे, असे ऑल इंडीया वेब मीडिया असोसिएशन-अध्यक्ष. अनिल महाजन यांनी एका प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
अनिल महाजन यांनी प्रसिध्दीपत्रकात पुढे म्हटले आहे की,  ही मुबंई काही कोणाच्या बापाची नाही कुठल्याही मोठ्या कलाकाराने असे समजू नये. हे कायद्याचे राज्य आहे. कोणत्या ही मोठ्या प्रोडक्शन कंपनी /प्रोड्युसर/डायरेक्टरने किंवा मोठ्या कलाकाराने कोणावर अन्याय केल्यास बिनधास्त माझ्याशी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करावे. बॉलिवूड मध्ये कोणाची ही दादागिरी खुपुन घेतली जाणार नाही.चुकीचे काम करण्याऱ्या प्रोडक्शन कंपनी /प्रोड्युसर/डायरेक्टरवर व बॉलिवूड क्षेत्रात काम करणारे सर्व मोठ्या एजन्सी यांना कायदेशीर योग्य तो धडा आम्ही शिकवल्या शिवाय राहणारं नाही.
जे कलाकार,छोटे प्रोडक्शन हाऊस चालक ,करियर घडवण्यासाठी आलेले अनेक तरुण, तरुणी, यांच्यावर कोणी दबाव टाकत असेल कोणी धमकी देत असेल किंवा आर्थिक नुकसान करत असेल. यामुळे  आपण जर मानसिक दबावाखाली आले असाल तर चिंता करू नका. चुकीचे पाऊले उचलू नका. आम्हाला संपर्क करा तुमच्या अडचणी आमच्या बरोबर शेअर करा मी आपल्या पाठीशी आहे. आपणास आम्ही योग्य न्याय मिळून देऊ, असे .ऑल इंडीया वेब मीडिया असोसिएशन-अध्यक्ष. अनिल महाजन यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here