कोरोनायोध्द्यांची राष्ट्रपती पदकसाठी शिफारस करावी – अनिल महाजन

मुंबई- येथील महाराष्ट्र राज्याचे ओ.बी.सी. नेते अनिल महाजन यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन दिले असून, यात कोरोनासारख्या भयंकर आजाराच्या कंटेन्मेंट झोनमध्ये काम करण्याऱ्या सर्व पोलिसांना व अधिकाऱ्यांना व कोरोनामध्ये मृत्यू झालेल्या लोकांची मृत शरीर स्मशानभुमीत पोहचवणाऱ्या कर्मचाऱ्यांना व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर या सर्वांना राष्ट्रपती पदक देण्यात यावे तशी शिफारस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती भवन कडे करावी अशी मागणी केली आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, राज्यात कोरोनाचा थैमान मोठया प्रमाणात वाढतच आहे. अशात पोलीस,डॉक्टर,आरोग्य कर्मचारी रुग्णवाहिका चालक हे सर्व लोक आपला जीव धोक्यात घालून काम करत आहे. मुबंईसह राज्यातील सर्वच हॉस्पिटल मध्ये रात्र दिवस हे लोक काम करत आहे.आज प्रत्येक जण आपआपला जीव सांभाळून घरात बसले आहेत. सर्व ठिकाणी अस्थिरता निर्माण झाली आहे. हे सर्व दैनंदिन घडामोडी बघत असताना कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाकडे पाहून अतिशय वेदना होत आहे. मन भरून आले आहे. अशात आशा होतकरू लोकांसाठी अनेक पुरस्कार, पदक दिले तरी कमीच आहेत. परंतु समाजात वावरतांना काहीतरी सन्मान लागतोच म्हणून आशा सर्वकर्मचारी,अधिकारी,डॉक्टर यांची मुबंईसह राज्यभरात जिल्हास्तरीय नावासह खरोखर कोरोना योद्धा म्हणून काम करण्याऱ्या कर्मचारी वर्गाची आपण राष्ट्रपती पदक यांना देण्यात यावा. अशी शिफारस आपण केंद्र सरकारकडे किंवा राष्ट्रपती भवनकडे करावी ही आपणास एक सामाजिक कार्यकर्ता व लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून विनंती करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here