आर्थिक स्तोत्राचा योग्य उपयोग

बेलापूर (यशवंत चव्हाण) – आपल्या देशाची अर्थव्यवस्था तशी अति कर रूपाने भक्कम आहे पण काही राजकीय नेते आणि भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी,लोकप्रतिनिधी,कंत्राटदार ते चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचारी यांच्या आर्थिक भ्रष्टाचारामुळे व अति लोभापायी देशावर राज्यावर लाखो कोटींचं कर्ज आहे ते वाढत चालले आहे.१५०० कोटी चा मालक असलेला लोकप्रतिनिधींच्या संपत्ती बाबत संशय व्यक्त केला जातो त्या अनुषंगाने सांगावेसे वाटते कोरोनासारखा महागुरू अश्या व्यक्तींना सावध करतोय,बाबानो,जे काही अनिष्ट पद्धतीने वा जरुरीपेक्षा जास्त माया जमवली आहे त्याचा विनियोग सामाजिक क्षेत्रातील वंचित नागरिकांसाठी उदार हस्ते मदत करा.उदा.वृद्धाश्रम गरीब भिकारी,झोपडपट्टी,बैठ्या चाळी ह्यांच्या आवश्यक गरजांची पूर्तता करणे,अपंग संस्था,गाव खेड्यात पाण्याची समस्या,हवालदिल शेतकरी त्याला लागणारे बी बियाणे,कर्जाचे हफ्ते भरणे,गाव दत्तक घेऊन त्याचा सर्वांगीण विकास करणे,गरीब वंचित दुर्लक्षित महिलांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी छोटे उद्योग करण्यास आर्थिक साहाय्य करणे,तरुण बेरोजगार तरुण तरुणींसाठी आर्थिक सहाय्य्य करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करणे,सरकारी मोडकळीस आलेल्या शाळेची डागडुजी करावी,शाळेला लागणारे साहित्य पुरवावे,विध्यार्थ्यांना लागणारे गणवेश वह्या पुस्तके यांची तरतूद करणे,विद्यार्थ्यांना शारीरिक श्रमाचे,खेळण्याचे साहित्य पुरवावे.विद्यार्थाना चांगला खुराक मिळावा यासाठी व्यवस्था करणे,सांस्कृतिक कार्यक्रमासाठी बंदिस्त हॉल,व मैदाने तयार करून द्यावी.पंतप्रधान वा मुख्यमंत्री रिलीफ फंडाला मदत न करता देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी उत्तम खुराक,आवश्यक कपडे,साहित्य इत्यादीसाठी सैनिक रिलीफ फंडाला भरघोस देणगी द्यावी ती काळाची व देशाची गरज आहे.वीरगती प्राप्त झालेल्या जवानांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देऊन त्यांच्या पाल्यांचा शिक्षणाचा सर्व खर्च उचलणे,अशी बरीच दुर्लक्षित असलेल्या गोष्टी अंमलात आणाव्यात.पैसे सत्कारणी लागेलच व जी मनशांती लाभेल त्यासारखं स्वर्गसुख नाही.अश्या कृतीने देश बळकट होईलच पण अखंड समाज स्थिरस्थावर होऊन प्रगती करेल. (लेखक जेष्ठ समाजसेवक/निवृत्त बँक शाखाधिकारी आहेत. मो.न. 9920776277)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here