मुंबई – देशात लॉकडाऊन मध्ये विविध भागात सूट दिल्यामुळे अनेक दुकानं उघडली असून अंधेरी पश्चिम येथील फक्त चर्मकार लोकांना आपापले स्टॉल उघडण्यास मनपाने बंदी घातली आहे. तेथील अनेक चर्मकार बांधवांनी आपली समस्या श्री. खलील अहमद शेख यांच्या माध्यमातून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. शांताराम कारंडे यांना सांगितली.
त्यानंतर डॉ. कारंडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ताबडतोब माजी समाजकल्याणमंत्री बबनराव (नाना ) घोलप यांच्याशी फोनवर चर्चा करून सदर समस्या त्यांच्या कानावर घातली. त्यानंतर मा. नानांनी आदेश देताच डॉ. कारंडे यांनी राष्ट्रीय सल्लागार पंढरीनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सचिव श्रीमती सरोज बिसुरे, उमाकांतजी डोईफोडे यांच्या सहकार्याने मुंबई कार्याध्यक्ष राजेशजी खाडे यांच्यासोबत वॉर्ड ऑफिसर विश्वास मोटे, इंक्रोचमेन्ट सिनिअर घेरे यांची समक्ष भेट घेऊन त्यांना समस्त चर्मकारांच्या वास्तविक समस्या समजावून सांगितल्या. प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर वॉर्ड ऑफिसर यांनी आरोग्याची योग्य काळजी घेत, सोशल डिस्टन्स मेंटेन करून तुम्ही व्यवसाय करा असे आश्वासन दिले. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अंधेरीतील सर्व चर्मकारांनी आभार मानले.






