गुजरातहून पुण्याला जाणारा ६६ लाखाचा अवैध गुटखा स्थानिक गुन्हे शाखेला पकडण्यात यश

वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.के.के.पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती समजली की, सापुतारा ते नाशिक रोडने एक चॉकलेटी रंगावे मालट्रकमधुन गुजरात राज्यातुन नाशिक शहराच्या दिशेने अवैध गुटखा येत आहे. सदर मिळालेल्या बातमीप्रमाणे त्यांनी तात्काळ प्रभारी पोलीस अधीक्षक श्री.संदिप घुगे सो..(अपर पोलीस अधीक्षक मालेगाव) व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर मॅडम यांना माहिती दिली, त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थागुशा यांनी त्यांचे अधिपत्याखालील अधिकारी व कर्मचारी यांना सापुतारा ते नाशिक रोडवर वाना केले. त्यांनी सापुतारा ते नाशिक रोडवर ओझरखेड परिसरात सापळा रचला, मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एक चॉकलेटी रंगाची मिलिट्री के.एम.एच १२ एस.एफ.४५७५ ही गाडी नाशिक बाजुकडे येतांना दिसली. सदर वाहन अडवुन वाहनावरील चालक नामे मंगेश गोरखनाथ व-हाडी, वय ४८, रा. पिंपळगाव तर्फे नारायणगाव, ता.जुन्नर, जि.पुणे यास विचारपुस केली असता, सुरुवातीला त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली, नंतर सदर वाहन हे वणी पोलीस स्टेशनला घेवुन जावुन त्याची तपासणी केली असता त्यामध्ये काही परच्युटन माल व परच्युटन मालाच्या आतमध्ये सफेद रंगाच्या गोण्यांमध्ये आर.एम.डी. गुटख्याचे १२० मोठे बॉक्स, तसेच एम. टोबॅको मिक्स तंबाखुचे ६० मोठे बॉक्स किं.रू.४८ लाख ९६ हजार चा अवैध गुटखा, ०७ लाख ३२ हजार ७९० रूपये परव्युटन माल, १० लाख रुपये किंमतीचे मालट्रक वाहन असा एकुण ६६ लाख २८ हजार ७९० रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर वाहनावरील चालकास विश्वासात घेवुन चौकशी केली असता सदर माल हा गुजरात राज्यातील पिंपळद, अहमदाबाद येथील बटको ट्रान्सपोर्ट येथुन भरलेला असुन पुणे येथे बटको टान्सपोर्टचेच ऑफिस मध्ये घेवुन जात असल्याचे सांगितले आहे. सदर बाबत वाहन चालकाविरूध्द वणी पोलीस ठाणेस भादवि कलम ३२८,२७२,२७३ सह अन्न सुरक्षा व मानके कायदा सन २००६ चे कलम २६(२)(iv), २७(३)(d)(e), ३०(२)(a), ३(१)(72) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदर माल हा कोणी पाठविलेला आहे तसेच कोणाला व कोठे पाठविण्यात येत होता याबाबत सखोल तपास करण्यात येत आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हयाचे प्रभारी पोलीस अधीक्षक श्री.संदिप घुगे सो.(अपर पोलीस अधीक्षक मालेगाव) व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. के.के.पाटील, सहा.पोलीस निरीक्षक श्री.अनिल वाघ, सपोउनि रामभाऊ मुंढे, पोहवा दिपक आहिरे, वसंत साबळे, गणेश वराडे, प्रकाश तुपलोंढे, हनुमंत महाले, जे.के. सुर्यवंशी, संजय गोसावी, पोना प्रविण सानप, वसंत खांडवी, अमोल घुगे, पोकॉ संदिप लगड, चालक पोना काकडे, म्हसदे यांचे पथकाने सदर कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here