जुईनगर प्रभाग क्रमांक ८२ चे समाजसेवक विजय साळे विविध प्रकारच्या समस्यांवर आक्रमक

आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन सादर केले निवेदन

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – कोरोनाविषयक विविध समस्यांवर आज समाजसेवक विजय साळे आक्रमक झाले. त्यांनी आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन नवी मुंबई महानगरपालिका यांनी पत्र काडून सुध्दा आजून काही शाळा संपूर्ण फी मागत आहे, मागणीनुसार शाळेने फक्त ट्युशन फी घ्यावी, आरटीई वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन कधी देणार, अंत्यविधीसाठी मयत व्यक्तीला शववाहिका सुविधा नवी मुंबई महानगरपालिका यांनी द्यावी, मयत व्यक्तीच्या घरच्याची काही खाजगी रुग्णवाहिका लूट (भरमसाठ ) पैसे घेत आहे, नवी मुंबई महानगरपालिका लाईव्ह बेड लोकेशन उपलब्ध कुठे आहे अशी जी माहिती देत आहे ती चुकीच्या स्वरूपाची आहे, अशा हॉस्पिटलवर कारवाई करून त्यांची मान्यता रद्द करावी जे आयसीयु व्हेंटिलेटर बेड असूनसुध्दा गंभीर कोरोना आजारी व्यक्तीला बेड देत नाही, त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी या विषयांवर चर्चा केली.
आयुक्त अभिजीत बांगर यांनी हे सर्व विषय गंभीर असून त्यावर लवकरच तोडगा काढून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन समाजसेवक विजय बाबासाहेब साळे यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here