पनवेल/अलिबाग (प्रतिनिधी) सोगावकर – रायगड-माथेरान चे मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस तथा महाराष्ट्र न्यूज-24 चे संपादक संतोष पवार यांचे कोरोनामुळे निधन झाले.त्याबद्दल दुःख व्यक्त करताना अलिबाग येथील ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील म्हणाले कि, संतोष पवार हे आमचे मित्र होते, तसेच अभ्यासू पत्रकार होते आणि ते संगीत कलेचे चाहते होते,त्यांनी आपल्या न्यूज चॅनेलवर रायगड जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले. त्यांच्या कुटुंबीयांवर आलेल्या अचानक दुःखात आम्ही रायगडचा युवक परिवार सामील आहोत, माझ्या तमाम महाराष्ट्रातील पत्रकार मित्रांनो आपली काळजी घ्या, कायम मास्कचा वापर करा,सॅनिटायझर चा प्रत्येक वेळी वापर करा, घरी जाताना आपले कपडे सर्व गरम पाण्यात धुवून घ्या आणि महत्वाचे म्हणजे प्रथम आंघोळ करा, मगच घरातील सदस्यांसोबत बोला ही सर्वांना विनंती,असे आवाहन रायगड भूषण,ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील प्रवक्ता संपादक व पत्रकार सेवा संघ मुंबई महाराष्ट्र,यांनी केले आहे.







