जळगाव जिल्ह्यात आज ७१८ कोरोनाबाधितांची कोरोनावर मात

आज आढळले १०९८ कोरोनाबाधित; १९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आज (दि.10) प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात १०९८ कोरोनाबाधित आढळून आले. त्यात सर्वाधिक जळगाव शहरात ३७० कोरोनाबाधित आढळले असून, त्याखालोखाल भुसावळ, अमळनेर व चोपडा तालुक्यातही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज ७१८ कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सद्यपरिस्थिीत ९ हजार ६६१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील होम आयसोलेशन केलेल्या कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार २८० असून, विलगीकरण कक्षात ४८४ कोरोनाबाधित आहेत.
आज आढळलेल्या १०९८ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर- ३७०, जळगाव ग्रामीण-५१, भुसावळ-७४, अमळनेर-१०६, चोपडा-९७, पाचोरा-४६, भडगाव-११, धरणगाव-५१, यावल-२३, एरंडोल-३९, जामनेर-१२, रावेर-७१, पारोळा-१८, चाळीसगाव-७२, मुक्ताईनगर-२९, बोदवड-१४ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील १४ असा समावेश आहे.
आज अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३६ हजार ४४० इतकी झाली असून आजवर २५ हजार ८४६ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान आज १९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा ९३३ इतका झाला असल्याची माहिती, शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here