कोरोनायोध्दा डॉक्टरांचा कल्याणमध्ये मृत्यू

कल्याण – शहरातील प्रतिथयश स्त्रीरोग तज्ज्ञ आणि कल्याण आयएमएचे डॉक्टर पराग पाटील यांचे रविवार (ता.२१) कोरोनाशी लढताना निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. कल्याणातील एक नामांकित स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे आयएमएमवर शोककळा पसरली आहे.
कल्याण इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण डॉक्टर्स आर्मी अंतर्गत कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. या डॉक्टर्स आर्मीमध्ये डॉ. पाटील हे देखील सुरुवातीपासून कार्यरत होते. कोरोना झाल्याने गेल्या २० ते २५ दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
डॉ. पाटील यांच्या पश्चात पत्नी (स्त्रीरोग तज्ञ) आणि दोन मुली असा परिवार आहे. डॉ. पाटील यांच्या जाण्याने कल्याण आयएमए आणि कल्याण डॉक्टर्स आर्मीसाठी एक मोठा धक्का असल्याची प्रतिक्रिया डॉ. प्रशांत पाटील यांच्यासह अनेक डॉक्टरांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here