सातारा (मंदार शेटे) – भारतीय सैनिक, आणि हुतात्मा सैनिक परिवार यांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी , त्यांना समाजात मान सन्मान मिळवून देण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या जयहिंद फाऊंडेशन या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मानीय श्री. संदीप माने साहेब यांचा २० जून हा वाढदिवस दिन आहे. हा दिवस जयहिंद फाऊंडेशन हि संस्था सन्मानीय श्री.संदीप माने यांचा वाढदिवस हा रक्तदान करून साजरा करते. २०१७ पासून हा दिवस दरवर्षी मोठ्या हर्ष उत्साहात, आणि आनंदात साजरा केला जातो..
नुकताच चीनने गालवान घाटीत आपल्या भारतीय सैनिकांच्यावर निर्दयी हल्ला केला आणि जवळ जवळ आपले २० जावान हुतात्मा झाले आहेत..आणि अनेक सैनिक जखमी झाले आहेत. तसेच मार्च-२० पासून जगा सह आपल्या देशावर कोरोना या साथीच्या आजाराने विळखा घातला आहे, ज्या विळख्यात आपले अनेक भारतीय बंधू आणि भगिनीचा बळी गेला आहे.. याच पार्श्वभूमीवर आजचा हा वाढदिवस हर्ष उत्साहात, आणि आनंदात न साजरा करता सोशल अंतर ठेऊन फक्त रक्तदान करून आपल्या हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय श्री.संदीप माने साहेबांनी घेतला आहे. सातारा येथे वेदकुल, बॉम्बे रेस्टारंट या चौकात रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. जवळ जवळ ५० युनिट रक्त जमा करण्याचा संस्थेचा मानस आहे.
राष्ट्राभीमानं , देशप्रेम, आणि आपले सैनिक यांच्या विषयी प्रचंड आदरभाव आणि सन्मान असलेले, सामाजिक संवेदनशील, सामाजिक जबाबदार आणि तरुण आणि तडफदार उद्योजक श्री. संदीप माने साहेब यांना संपूर्ण जयहिंद परिवारातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा..
देशातील प्रत्येक तरुण हा उद्योजक व्हायला हवा हि चळवळ हाती घेऊन श्री. संचित माने साहेब तरुणांनासाठी व्यवसायाचं फार मोठं व्यासपीठ उभं करत आहेत.. जिथे प्रत्येक तरुणाणे आपल्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव देऊन स्वतःसह देशाच्या प्रगतीत हातभार लावला पाहिजे असं त्यांना वाटत आणि त्या साठी ते सदैव कृतिशील असतात..
अतिशय मनमिळाऊ, लोकसंग्रही आणि तितकंच संयमी आणि खंभीर असं नेतृत्व असलेले श्री.संदीप माने यांनी जयहिंद फाऊंडेशनची धुरा सांभाळत संस्थेला जम्मू काश्मीर पर्यंत घेऊन गेले आहेत.. देशांतच नव्हे तर जगात शांतता निर्माण झाली पाहिजे जमिनीच्या तुकड्यासाठी एका सैनिकाने दुसऱ्या सैनिकाचा जीव नाही घेतला पाहिजे या साठी अखंड काम करणाऱ्या या महान व्यक्तिमत्वाला जयहिंद परिवारातर्फे परत एकदा वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.







