बोदवड – बोदवड तालुक्यातील ग्रामीण भागात करोनाचा कहर वाढत असून एकट्या करंजी या गावातील २० जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
करंजी येथील ३९ वर्षीय पॉझिटिव्ह आलेल्या त्या रुग्णाच्या संपर्कातील तब्बल 20 जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्यामुळे बोदवड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ३७ झाली आहे व दोन रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तालुक्यातील ११ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, २४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.







