मुंबई (प्रतिनिधी) – रामायणात ‘सीता’ची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखालिया यांनी शनिवारी आपल्या चाहत्यांना एक दुःखद बातमी दिली. त्यांनी सांगितले की त्यांच्या आईचे निधन झाले आहे. ही माहिती तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे. दीपिकाच्या आईचा मृत्यू कशामुळे झाला याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. दीपिकाने एक भावुक पोस्ट लिहिली आहे ज्यात तिने आपल्या आईच्या निधनामुळे झालेले दुःख व्यक्त केले आहे.
दीपिका चिखालियाने इंस्टाग्रामवर लिहिले आहे, ‘आई-वडिलांचे निधन होणे हे एक असे दुःख आहे जे सहजपणे विसरता येत नाही.’ त्यांनी ही पोस्ट शेअर करत लिहिले आहे, ‘आई, तुझ्या आत्म्याला शांती मिळो.’ दीपिकाने ही दुःखद बातमी दिल्यानंतर लोक तिच्याप्रती सहवेदना व्यक्त करत आहेत. एका युजरने कॉमेंट करत लिहिले आहे, ‘आई, सर्वांसाठीच खूप मोठे दुःख असते. आपण काळजी घ्या. त्या नेहमीच तुमच्यासोबत आहेत.’ अन्य एका युजरने लिहिले, ‘अतिशय दुःखद. आम्ही आपले दुःख कमी करू शकत नाही, पण वाटून घेऊ शकतो. आपण दुःखी होऊ नका. आपल्या आईचे आशीर्वाद सदैव आपल्यासोबत आहेत.’
दीपिका चिखालियाने रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत सीतेच्या भूमिकेद्वारे प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. लॉकडाऊनदरम्यान या मालिकेचे पुनःप्रसारण झाल्याने तिच्यासह मालिकेतील अनेक कलाकारांची लोकप्रियता पुन्हा एकदा वाढली. लॉकडाऊनदरम्यान ही मालिका लोकांच्या प्रचंड प्रसिद्धीस उतरली आणि आणि टीआरपीच्या शर्यतीतही मालिकेने चांगलीच बाजी मारली. टीआरपीचे सर्व विक्रम या मालिकेने तोडले. रामानंद सागर यांनी बनवलेले हे रामायण आत्तापर्यंतचे सर्वात यशस्वी रामायण आहे.







