जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आज (दि.१२) प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आज ८६२ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. ८२४ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली असली तरीही आज जळगाव शहरात २७७ कोरोनाबाधितांसह भुसावळ, पारोळा आणि चाळीसगाव तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे.
आज आढळलेल्या ८६२ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर-२७७, जळगाव ग्रामीण-४६, भुसावळ-७१, अमळनेर-४३, चोपडा-५५, पाचोरा-३१, भडगाव-३०, धरणगाव-३६, यावल-२२, एरंडोल-३५, जामनेर-२६, रावेर-१५, पारोळा-६९, चाळीसगाव-६१, मुक्ताईनगर-१७, बोदवड-५ व दुसर्या जिल्ह्यांमधील २३ असा समावेश आहे.
आज आढळलेल्या कोरोनाबाधितांनंतर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची ३८ हजार १६९ झाली असून, २७ हजार २११ कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. दरम्यान आज १४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा ९६० झाला असून, सद्यस्थितीत ९ हजार ९९८ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे
Home उत्तर महाराष्ट्र जळगाव ८२४ रुग्ण कोरोनापासून मुक्त पण जळगाव, भुसावळ, पारोळा आणि चाळीसगावला रुग्णवाढ







