पोलीस बॉईज असो.ची मागणी; मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत 2000 अधिकारी व पोलीस कर्मचारी आहेत परिक्षार्थी
मुंबई (विशेष प्रतिनिधी सिध्दार्थ जाधव) – मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत 2000 अधिकारी व पोलीस कर्मचारी हे एमएस-सीआयटी संगणक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोरोना महामारी मुळे अनेक अडचणी येत आहे या कोरोनामुळे अनेक पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी मृत्यूमुखी पडले आहे तसेच अनेक अधिकारी कर्मचारी कोरोनाबाधित झालेले आहे आणि त्याचा अतिरिक्त ताण पोलिस कर्मचाऱ्यांवरही येत आहे त्यात शासनाच्या नियमानुसार एमएससीआयटी प्रमाणपत्र मिळवणे बंधनकारक केले आहे.
उपरोक्त अधिसूचनेच्या अनुषंगाने ज्या अधिकारी कर्मचारी यांनी एमएससीआयटी संगणक प्रमाणपत्र सादर केले नाही त्यांना सादर करणेबाबत संबंधित आस्थापने कडून कळविण्यात आले आहे परंतु एमएस-सीआयटी संगणक प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी कित्येक अधिकारी कर्मचारी यांनी प्रवेश घेतलेला आहे तथापि कोरोना विषाणूजन्य परिस्थितीमुळे परीक्षा रद्द झाल्यामुळे सध्या स्थितीत अधिकारी कर्मचारी एमएस-सीआयटी संगणक प्रमाणपत्र सादर करू शकले नाही तरी मुंबईतील अधिकारी कर्मचारी यांना चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी पोलीस बॉईज असोसिएशनतर्फे मुंबई पोलीस आयुक्त परमविर सिंह यांना करण्यात आली आहे.
ज्याप्रमाणे पुणे पोलीस आयुक्त व नवी मुंबई पोलीस आयुक्त एम एस सी आय टी परीक्षा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी चार महिन्याची मुदत दिली आहे त्याचप्रमाणे मुंबईतील कोरोना योद्ध्यांना पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना सुद्धा डिसेंबर पर्यंत चार महिन्यांची मुदतवाढ द्यावी. यासाठी पुणे पोलीस आयुक्त व नवी मुंबई पोलीस आयुक्त एमएस-सीआयटी प्रमाणपत्र मुदतवाढ दिल्याची प्रत त्यांनी निवेदनाला जोडली आहे. हे निवेदन देताना पोलीस बॉईज असोसिएशनचे प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य सिद्धार्थ जाधव व प्रदेशाध्यक्ष मुंबई अमोल माने उपस्थित होते.








