शर्लिन चोपडाने सांगितले की, प्रत्येक फिल्मीपार्टीत ‘ती’ ऑफर मिळायची

मुंबई (जॉनी वाझ) – बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन मुद्द्यावर सध्या चर्चा होत आहे. आता अभिनेत्री आणि मॉडल शर्लिन चोप्राने एक धक्कादायक खुलासा केला आहे. शर्लिनच्या माहितीनुसार, बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ड्रग पार्टी असते. पार्टीमध्ये स्टार्स ड्रग्जचा खूप वापर करतात. पार्टीमध्ये बोलावून ड्रग ऑफर केले जाते. सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून शर्लिन चोप्राने धक्कादायक दावा केला आहे.
अभिनेत्री शर्लिन चोप्राने इन्स्टाग्रामवर आपला एक योगा करताना व्हिडिओ शेअर केला आहे. तिने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ”मी चेन स्मोकर होते. परंतु, ऑक्टोबर, २०१७ मध्ये मी स्मोकिंग (धूम्रपान) सोडले आहे. ड्रग्जपासून मी नेहमी दूर राहिले आहे. इंडस्ट्रीवाले पार्टीत बोलावून ट्रे वर ड्रग्ज ऑफर करतात, असेही शर्लिनने म्हटले आहे. शर्लिनच्या दाव्यात किती सत्यता आहे, हे अद्याप समजलेलं नाही. सोशल मीडियावर शर्लिनची ही पोस्ट व्हायरल होत आहे.
याआधी शर्लिनने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, ‘सुरूवातीच्या दिवसांत तिला चित्रपट निर्माते डिनरसाठी बोलवायचे. परंतु, त्य़ांचे डिनरला आमंत्रित करण्यामागील कारण तेव्हा तिला समजले नव्हते. नंतर तिला समजलं की, डिनरचा अर्थ आहे, समझोता करणे.’
शर्लिन चोप्राने सांगितलं होतं की, तिला याविषयी जेव्हा समजलं तेव्ही तिने नकार देण्यास सुरुवात केली. ती म्हणाली की, ‘ते सातत्याने मला संपर्क करायचा प्रयत्न करायचे. मग मी निर्णय घेतला की, डिनरसाठी जायचे नाही. यानंतर, ज्यांनी कुणी मला डिनरसाठी आमंत्रित केलं, मी त्यांना नकार देऊ लागले. मी डिनर करत नाही, माझे डाएट सुरू आहे. तुम्ही ब्रेकफास्‍टवर बोलवा, लंचवर बोलवा, अशी मी त्यांना सांगायची. पुन्हा त्यांनी मला संपर्क केला नाही.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here