मुंबई (हितेश मिस्त्री) – ॲक्सिस बँक प्रकरण पदाचा गैरवापर नव्हता का? असा सवाल एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. भाजपमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. मागील दोन दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीका केली होती.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलिसांचा पगार ॲक्सिस बँकेमध्ये वळवण्यात आला होता. हा प्रकार म्हणजे पदाचा गैरवापर नव्हता का? माझ्यावर आरोप झाल्यानंतर लगेच माझा राजीनामा घेण्यात आला. पण बाकीच्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही. असा आरोपही एकनाथ खडसे यांनी यावेळी केला.
मुक्ताईनगर येथे `जनसेवेचा मानबिंदू एकनाथ खडसे` या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी त्यांनी टीका केली होती. पक्षातील सर्वच नेते जर मला चांगले आहेत असे म्हणतात मग पक्षाने माझे विधानसभेत तिकीट का कापले याचे उत्तर मला अजूनही सापडलेले नाही त्याचा शोध मी घेत आहे. असेही एकनाथ खडसे म्हणाले होते.
विरोधी पक्ष नेता हाच भविष्यात या पक्षाची सत्ता आल्यास मुख्यमंत्री असतो असे संकेत असतात. मात्र, पक्षाची सत्ता आल्यानंतर मला का डावलण्यात आले? याचाही मी शोध घेत आहे. मला घाबरला याचं मला वाईट वाटत नाही. परंतु, माझी राजकीय कारकीर्द ज्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला ज्यांनी कुभांड रचले, त्यांना येत्या काळात उघड करण्याचे काम मी करणार आहे कोण भंगाळे दारूच्या बायकोची संबंध जोडले गेले देशाचे संघटनमंत्री यांचाही नंबर त्या यादीत असताना त्यांना साधे विचारले सुद्धा गेले नाही असाही त्यांनी टोला लावला होता.







