मुंबई (जॉनी वाझ) – बोल्ड मॉडेल, अभिनेत्री पूनम पांडे विवाहबंधनात अडकली आहे. तिने आपला बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेशी सात फेरे घेतले. तिने आणि सॅमने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. सॅम मुंबईत राहतो आणि चित्रपट दिग्दर्शक आहे. सोशल मीडियावर पूनमला फॅन्स शुभेच्छा देत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, हे लग्न बांद्रा येथे पार पडले. ही एक प्रायवेट सेरेमनी होती. यामध्ये कुटुंबातील आणि काही जवळचे मित्र सहभागी झाले होते.








