भाजप काळातील 13 सप्टेंबर च्या निर्णयातील अटी शिथील करण्यासाठी येत्या कँबीनेटमध्ये निर्णय घेणार – अजीत पवार

मुंबई – शिक्षण विभागातील सर्व समस्या सोडवीण्याच्या दृष्टीने वरीष्ठ पातळीवर चर्चा होणे गरजेचे होते. त्यामुळे आमदार बाळाराम पाटील , आमदार देशपांडे, आमदार सावंत यांनी दि.15 जुन 2020 रोजी शिक्षणमंत्री ना.वर्षाजी गायकवाड यांची भेट घेवून चर्चा केली असता अर्थ विभागातील तांत्रीक बाबी पाहता समस्या सुटने कठीन वाटायला लागले.ना वर्षाजी गायकवाड 4 वाजता सह्याद्री येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटायला गेल्या आणी तेथून भेटून परत आल्यानंतर अजित पवारांनी त्यांना फाईल पुटप करायला सांगितल्या.परंतू या मुळे प्रश्न सुटणार नाही फाईल परत येईल याची खात्री वाटल्यामुळे आमदार बाळाराम पाटील, आमदार देशपांडे, आमदार सावंत यांनी श्रध्येय शरदचंद्रजी पवार यांना भेटण्याचे ठरवले श्री शरद पवार मुंबईत नव्होते त्यामुळे रातोरात बारामती गाठून दि.16 जुनला गोविंदबाग येथे दुपारी शरद पवार साहेबांची भेट घेतली.आणी त्यांना यामधे हस्तक्षेप करण्याची विनंती केली.पवार साहेबांनी त्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजीत पवारांना फोन करुन काही सुचना केल्या आणि लवकरच बैठक लावतो असे आश्वासन दिले. त्यामुळे काल दि 21 जुन रोजी सायंकाळी शिक्षक आमदार बाळाराम पाटील, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार दत्तात्रय सावंत यांचे फोन खनखनले आणी निरोप मिळाला 22 जुन ला 11:30 वाजता सह्याद्री येथे बैठक आयोजित केली आहे उपस्थित राहावे.
पुन्हा एकवेळा रातोरात तिघांनी मुंबई गाठली आणी सह्याद्री येथे भाजपच्या काळातील 13 सप्टेंबर 2019 च्या जाचक शासन निर्णयातील सर्व अटी शिथील करुन प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक घोषित सर्व संस्थांना 20 टक्के अनुदान आणी पुढील टप्पा 20 टक्के अनुदानित अंशतः शाळांना देण्यात येणार या करीता येत्या कँबीनेटला नोट सादर करण्याचे आदेश श्रध्येय शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या आज 11:30 वाजताच्या सह्याद्री अतीथी गृह मुंबई येथील बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी शिक्षण विभागाला दिले.
या बैठकीत अघोषीत प्राथमिक, माध्यमिक आणी उच्च माध्यमिक यांना घोषीत करणे,कमवीच्या 1298 वाढीव पदांना मंजूरी देवून अनुदान देणे आणी अशंतहा अनुदानित अतिरिक्त शिक्षकांना सेवा सरक्षण देणे या मुद्यावर सुध्दा चर्चा झाली. हे दोनीही मुद्दे सोडवीण्यासाठी 13 सप्टेंबर 2019 चा शासन निर्णय रद्द झाल्या नंतर वित्त विभागाची अडचन नाही शिक्षण विभागाने यावर कार्यवाही करावी असे निर्देश शिक्षणमंत्री ना.वर्षाजी गायकवाड यांनी शिक्षण विभागातील अधिऱ्यांना दिले.
या बैठकीला शिक्षणमंत्री ना.वर्षाजी गायकवाड उपस्थित होत्या.ना वर्षाताई गायकवाड यांनी आजच्या आज कँबीनेट नोट पुटप करण्याचे आदेश शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिले.कँबीनेट नोट व नविन शासन निर्णय बनविण्यासाठी तिनही शिक्षक आमदार मंत्रालयात तळ ठोकून आहे. बैठकीमधे कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील , अमरावती शिक्षक मतदारसंघाचे प्रा.श्रीकांत देशपांडे,पुणे शिक्षक मतदार संघाचे आमदार दत्तात्रय सावंत सर,वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक,प्रधानसचिव मित्तल यांच्या सह शिक्षण विभागाचे सह सचिव इ.मु.काझी,ल.वी.सावंत,आव्हाड इत्यादी उपस्थित होते.
सदर बैठकीत ना.अजीत पवार यांनी कँबीनेट मधे ठरल्याप्रमाणे केवळ पाच विभागांना निधी देत असल्याची माहिती शरदचंद्रजी पवार साहेबांना दिली.त्यामधे शिक्षण विभाग नसल्याने शिक्षणमंत्री वर्षाजी गायकवाड यांनी शिक्षण विभागाचा समावेश करण्याची विनंती वित्तमंत्री अजीत पवारांना केली.त्यावर अजीत पवारांनी येणाऱ्या कँबीनेट मधे विषय घेऊन मान्य करण्याचे ठरले अशी माहिती आमदार बाळाराम पाटिल यांनी दिली.
सदर बैठकीचे इतीवृत्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या कानावर टाकून 13 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयातील सर्व जाचक अटी येत्या कँबीनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठेवूनरद्द होणार आहे. आणी लवकरच बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित प्रश्न निकाली निघणार असल्याची माहिती कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here