लोकस्वराज्य फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन ट्रेड युनियन
कलावंत व तंत्रज्ञांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार
मुंबई (संपादक सुनिल पाटील) – चित्रपट तयार झाल्यानंतर निर्मात्याने जर कलाकार, दिग्दर्शक व तंत्रज्ञांचे मानधन दिलेले नसेल तर चित्रपट थिएटर्सला प्रदर्शित लावू देणार नसल्याचा निर्धार लोकस्वराज्य फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन ट्रेड युनियनचे मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश तळेकर यांनी व्यक्त केला आहे.
लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियनतर्फे काढण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकार मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश तळेकर म्हणतात की,काही जण चित्रपट बनवून झाल्यानंतरही त्या चित्रपटासाठी काम करणारे, तंत्रज्ञान , कलाकार , दिग्दर्शक , लेखक , प्रोडक्शन टीम , मेकअप टीम , स्पॉट बॉय , इ, अनेक प्रकारचे सदस्य त्यांना त्याचे ठरलेलं मानधन देत नाही. या प्रवृत्तीमुळे कलावंतांवर उपासमारीची वेळ येईल आणि चित्रपटसृष्टी ओस पडत जाईल.
गेल्या काही वर्षात काही चित्रपट असेही आहेत जिकडे वरील पैकी कित्येक जणांना त्यांच्या कामाचे मानधनही दिले गेले नाही पण ते चित्रपट टॉकीजमध्ये लागले गेले आहेत ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.पण या पुढे सर्वांनी लक्षात ठेवा, जर अशा प्रकाराबाबत कोणत्याही संघटनेला यापुढे आपली तक्रार नोंदवली असेल आणि तरी सुद्धा जर कोणताही चित्रपट टॉकीजला लागणार असेल तर लोकस्वराज्यचे मावळे तो चित्रपट कोणत्याही जिल्ह्यात लावू देणार नाहीत , जो पर्यंत चित्रपटाशी संबंधित सर्वांचे मानधन जे ठरलेले असेल ते दिले जात नाही आणि निर्माता त्या पीडित व्यक्तींची जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत चित्रपट कोणत्याही टॉकीजला लागू देणार नाही .
यापुढे कोणालाही कसलीही चित्रपट क्षेत्रात तक्रार असेल तसेच कोणी चित्रपटात काम देतो म्हणून जर पैशाची अथवा दुसरी कसलीही मागणी करत असेल तर लोकस्वराज्यकडे लेखी तक्रार द्यावी. तक्रारदारकडून लोकस्वराज्य कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारात नाही हे लक्षात ठेवा . ज्या पीडित व्यक्तीची फसवणुक झाली आहे त्याला प्रथम न्याय मिळाला पाहिजे हीच लोकस्वराज्यच्या कामाची पोच पावती आहे, असेही मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश तळेकर यांनी शेवटी सांगितले आहे.








