सनी लियोनने घेतली लग्झरी कार; किंमत वाचून व्हाल थक्क!

मुंबई (जॉनी वाझ) – बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री सनी लियोन ही कारची खूपच शौकीन आहे. तिने नुकतीच इटालियन Maserati Ghibli कार खरेदी केली आहे. सनी लियोनला या ब्रॅंडची कार सर्वाधिक पसंत आहे. यामुळेच तिच्याकडे Maserati क्वाट्रोपोर्टे आणि फेमस Maserati Ghibli नर्सिमा कार देखील आहे. सनी लियोनने आपल्या इंस्टाग्रामवर कारसोबतचा एक फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली. यात ती व्हाईट कलरच्या Maserati Ghibli सोबत दिसते.
सनीने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, मला ही कार चालविल्यानंतर खूपच आनंद मिळतो. ही कार मी खरेदी केलेली आहे. सध्या सनीचा हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या फोटोला आतापर्यत तब्बल 1 लाख 85 हजारांहून अधिक लाइक्‍स मिळालेले आहेत. तसेच हजारांहून अधिक कमेंटस्‌ आल्या आहेत.
Maserati Ghibli ही एक इटालियन स्पोर्टस आणि लग्झरी कार आहे. ही कार Quattroporteच्या तुलनेत छोटी आहे. परंतु हिची डिझाइन खूपच सुंदर आहे. या कारची भारतातील किंमत तब्बल 1 कोटी 31 लाखांपासून सुरू होते. तर अमेरिकेत 80 हजार यूएस डॉलर ऐवढी किंमत आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here