पिंप्रीत सोमवारपासून दोन दिवस जनता कर्फ्यू; मंगळवारी गावासह बाजारपेठ बंदचा निर्णय

पिंप्री खुर्द ता. धरणगाव ( प्रतिनिधी) – तालुक्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पिंप्री खुर्द गावात दिनांक १४ व १५ संप्टेबर ( सोमवार व मंगळवार ) पर्यंत दोन दिवसीय जनता कर्फ्युचे आयोजन केले आहे . ग्रामपंचायतच्या कोरोना नियंत्रण समीती , व्यवसाईक बांधव व ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वयंपूर्तीने हा बंद च्या निर्णय घेण्यात आला आहे .या बंद काळात गावातील फक्त दुध डेअरी सकाळी व संध्याकाळी ७ ते ९ पंर्यतच सुरू राहिल . या व्यतरिक्त मेडीकल सह सर्वच व्यावसाईक दुकाने दोन दिवस कडकडीत बंद राहतील .
मंगळवार हा बाजाराच्या दिवस असतो. शासनाच्या आदेशान्वेय बाजार बंद असुन त्या दिवशी गावात बाहेरून येणारे व्यवसाईक व परिसरातील सर्वच गावातील खरेदी करणाऱ्या लोकांची मोठी वर्दळ होते . हि बाब लक्षात घेता दर मंगळवारी गावातील सर्वच व्यवसायीक प्रातिष्ठाने बंद ठेवण्यात येणार आहेत.
तरी ग्रामस्थांनी या बंद काळात विनाकारण घराबाहेर फिरू नये . आपल्या गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या हितासाठी सर्वानी या दोन दिवसीय जनता कर्फ्यूस व दर मंगळवारी गाव बंद यास सहकार्य करावे , असे आवाहन ग्रामपंचायतच्या कोराना नियंत्रण समिती , व्यापारी ,व्यवसाईक बांधव व ग्रामस्थांनी केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here