मानवाधिकार व्हाईसच्या राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल रविंद्रदादा जाधव यांचा सत्कार

नाशिक (ओझर प्रतिनिधी अविनाश मुंढे) – डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात अन्याय अत्याचार निर्मुलन समिती ओझर शहर पदाधिकाऱ्यांच्या वतिने मानवाधिकार व्हाईस च्या राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल रिपाईचे राज्य उपाध्यक्ष व अआनिस चे प्रदेश अध्यक्ष मा.रविंद्र दादा जाधव यांचा नागरी सत्कार संपन्न झाला. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवाधिकार व्हाईस चे प्रदेश अध्यक्ष मा.गुड्डभाई सैयद हे होते तर मंचावर उ.महा.उपाध्यक्ष मा.वसंतराव वाघ, उ.महा.महासचिव मा. रफीक सैयद, उ.महा.उपाध्यक्ष मा.ममता पुणेकर, उ.महा.कोषाध्यक्ष मा.टीकुभाई कोहली, उ.महा.कार्याध्यक्ष मा.प्रदीपनाना गांगुर्डे, सिन्नर ता.अध्यक्ष मा.संदीप भालेराव आदीं उपस्थित होते. प्रथम राष्ट्रपुरुषांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर या वेळी वरिल प्रमुख मान्यवरांची मा.रविंद्र दादा जाधव यांच्या कार्याच्या गौरवार्थ समयोचित भाषणे झाली.
या प्रसंगी अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या निफाड तालुका कायदेविषयक सल्लागार पदावर अँड. श्रीमती वैशाली बाविस्कर खैरे यांची तर युवती जिल्हा संघटक पदावर कु.राधा कुटे नँशनल पहीलवान यांची पत्र देवुन रविंद्रदादा जाधव यांचे हस्ते नियुक्ती करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महीला तालुकाध्यक्षा श्रीमती शिलाताई जाधव यांनी केले तर तालुकाध्यक्ष शशीभाऊ जाधव, शहराध्यक्ष राजु नाना सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष मा.मनिषा पवार, जि.कोषाध्यक्ष मा.संदीप साबळे मा.सरपंच आशाताई जाधव, मा.शब्बीर खाटीक, चांदवड तालुकाध्यक्ष सौ. परविन बागवान, सिन्नर शहराध्यक्ष संजय भोजणे, मधुकर गवारे, शिवाजीराव गवळी, आदींची भाषणे झालीत. या कार्यक्रमास सर्वश्री प्रदीप पगारे, राजेंद्र भा.जाधव, प्रकाश कुमावत, पत्रकार प्रकाश गांगुर्डे, पत्रकार संतोष सोनवणे,नितिन ढेंगळे, भारत गवई, दिपक स. जाधव, विठाबाई जाधव, करण सोनवणे, शारदाताई जाधव, ताईबाई पवार, भारती साळवे, सुनिता निकम, रविंद्र धिवरे, अंजु साळवे, रंजना पगारे, बेबी आहीरे, विठाबाई जाधव, मंगल पगारे, मंगला गायकवाड, आनंद जाधव, निशा रोकडे, महेश जाधव, अँड.शेखर पगारे, संदीप ढेंगळे, संदीप बागुल, कुणाल जाधव, संगीता जाधव, माधुरी जाधव, डाँ. नेहा जाधव, शिला केदारे, चंद्रकला जाधव, पल्लवी जाधव, सांची जाधव, पल्लवी साळवे, विशाल साळवे, प्रियंका साळवे, उत्तम बनसोडे, चार्वाक जाधव, सागर जाधव, मधुकर आहीरे, आदींसह पदाधीकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीपनाना गांगुर्डे यांनी केले तर आभार शशीभाऊ जाधव यांनी मानले. राष्ट्रगिताने व सामुदायिक भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here