जळगाव – जळगाव कोविड केअर युनिट तर्फे मेहरून परिसरात चार दिवसा पासून कोरोनाचा प्रसार वाढू नये म्हणून सर्वेक्षण व मेडिकल कॅम्प सुरू आहे. रविवारी उमर मस्जिद,रजा मस्जिद, परिसरातील सर्वेक्षण व वैद्यकीय तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आले त्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळत३१७५ व्यक्ती चे व ५९० लोकांची वैद्यकीय तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. डॉ सुयोग चौधरी एमडी फिझिशन,एम डी सर्जन, माजी उपाध्यक्ष हुसेन मुलतानी, गफ्फार मलिक यांनी मोफत औषधी वाटप सेंटरचे व कॅम्प चे उदघाटन केले.महिला कॅम्प चे उदघाटन माजी मनपा उपाध्यक्ष सौ मुमताज बी मुलतानी,डॉ सौ सायका फारूक शेख,डॉ नसीम फिरोज शेख,डॉ कु सायमा अस्लम खान, कु अरशीन खान यांनी केले
मेहरूण परिसर हा मोठा भाग अल्पसंख्यांकाचा असून याठिकाणी जळगाव शहरातील जनरल प्रॅक्टिशनर हे सुद्धा अल्पसंख्यांक समाजाचे असल्याने त्यांनी स्वच्छेने या लोकांची तपासणी केली त्यात प्रामुख्याने डॉ फारूक शेख व डॉ सौ सायका शेख,डॉ फिरोज अहेमद व डॉ सौ नसीम शेख दोघेही जोडपे कार्यरत आहे सोबत डॉक्टर रियाज शेख, डॉक्टर जावेद शेख, डॉ मिनहाज पटेल, डॉक्टर अझीझुल्ला शेख, डॉक्टर मोईज देशपांडे, डॉक्टर असीम खान, डॉक्टर कामील शेख, डॉक्टर वसीअहमद, डॉक्टर फारुख सलीम, डॉक्टर रइस कासार, डॉक्टर रिजवान खाटीक, डॉक्टर रमीज खाटीक, डॉक्टर एजाज शाह, डॉक्टर जावेद मोसिर खान , डॉक्टर नसीम फिरोज खान,डॉ नदीम नजर,डॉ नदीम रहेमानी,डॉ वसीम शाह डॉ तौसिफ बिस्मिल्लाह,डॉ इकबाल शेख,डॉ अलीम बागवान,डॉ सौ आफ्रिन शेख,डॉ कु सायमा अस्लम खान, डॉ मतीन खाटीक यांनी रुग्णांची तपासणी केली.
या कार्याला मजीद राणांनी, शाकिर चित्तलवर,शकील टिक्की,अमीन किराणा इकबाल कॉलोनी, अझीम रफिक शेख, मुख्तार मिस्तरी यांनी आर्थिक सहकार्य केले. अझीस्टो मायसीन , अँटी कोल्ड ,अँटी कफ सिरप,टॅब टॉक्सी,टॅब अलमोक्स,टॅब अमोक्सी क्लाय,टॅब ओ टू, टॅब नोरफलोक्स टी झेड,आयबो प्यारा, टॅब निमो प्यारा,टॅब असोफेनिक पी,टॅब व्हिटॅमिन सी,ए, डी,टॅब आयरान पोलिक ऍसिड,टॅब मल्टि व्हिटॅमिन,टॅब परसिटोमोल,टॅब ओमी,टॅब राबिस, टॅब ओंझेनसिटोम,टॅब लिंग सी,टॅब झिंक सुल्फेट,टॅब मॅक्सटल फोर्ट,अँटी स्पस्मेटिक,गोळी व सिरप तसेच कॅल्शिअम च्या गोळ्या व औषधी मोफत देण्यात आल्या.
नगर सेवक रियाझ बागवन यांच्या नेतृत्वात डॉ रिझवान,सलीम इनामदार,अक्रम देशमुख,हाजी युसूफ शेख,तय्यब शेख,अताउल्लाह खान,इस्माईल शेख,रिझवान निसार, हुझेफा अतिक,हमजा अतिक,सरफराज इनामदार,शोएब शेख,आदिल खान,मोतीब झाकीर,तलहा तय्यब,शाकिर खान मुलतानी,फरीद खान मुलतानी,जुबेर मुलतानी,अल्ताफ व अश्फाक हुसेन यांनी परिश्रम घेतले.
रविवारी फातेमा मस्जिद, मदरसा अनवरुल उलूम, शेजारी या ठिकाणी वैद्यकीय तपासणी होईल. तरी या परिसरातील लोकांनी मोठ्या प्रमाणात सर्वेक्षणाला सहकार्य करावे असे आवाहन केअर युनिटचे मार्गदर्शक मुफ्ती आतिकुर रहेमान,अध्यक्ष गफ्फार मलिक ,समन्वयक डॉक्टर जावेद शेख व जनसंपर्क प्रमुख फारूक शेख यांनी केले आहे.







